Home / देश-विदेश / Artemis II : अंतराळ संशोधनात नवा इतिहास: नासाच्या ‘आर्टेमिस-२’ मोहिमेने मोडला ५६ वर्षांपूर्वीचा विक्रम; मानवाने गाठले अवकाशातील सर्वाधिक अंतर

Artemis II : अंतराळ संशोधनात नवा इतिहास: नासाच्या ‘आर्टेमिस-२’ मोहिमेने मोडला ५६ वर्षांपूर्वीचा विक्रम; मानवाने गाठले अवकाशातील सर्वाधिक अंतर

Artemis II : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) च्या महत्वाकांक्षी ‘आर्टेमिस-२’ (Artemis II) मोहिमेने अवकाशात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक...

By: Team Navakal
Artemis II
Social + WhatsApp CTA

Artemis II : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) च्या महत्वाकांक्षी ‘आर्टेमिस-२’ (Artemis II) मोहिमेने अवकाशात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीपासून सर्वाधिक दूर अंतरावर पोहोचण्याचा १९७० सालचा ‘अपोलो-१३’ यानाचा विक्रम मोडीत काढून मानवी इतिहासातील एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. तब्बल ५६ वर्षांनंतर मानवाने अंतराळात इतकी मोठी झेप घेतली असून, यामुळे आगामी चांद्र मोहिमांसाठी एक भक्कम पाया रचला गेला आहे.

५६ वर्षांनंतर ‘अपोलो-१३’चा विक्रम मागे-
नासाने १९७० मध्ये पार पाडलेल्या ‘अपोलो-१३’ या मानवी मोहिमेत अंतराळवीरांनी पृथ्वीपासून २ लाख ४८ हजार ६५५ मैल (सुमारे ४ लाख १६ किलोमीटर) इतके विक्रमी अंतर गाठले होते. तेव्हापासून आजवर कोणत्याही मानवी मोहिमेला इतक्या दूरवर पोहोचता आले नव्हते. मात्र, आर्टेमिस-२ मोहिमेतील ‘ओरायन’ (Orion) यानाने काल हे अंतर पार करून जुना विक्रम इतिहासजमा केला. मानवरहित यानांनी यापेक्षा जास्त अंतर पार केले असले, तरी मानवासह इतक्या खोल अंतराळात प्रवास करणे हे अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे मानले जाते.

ती थरारक ४० मिनिटे: जेव्हा पृथ्वीशी संपर्क तुटला-
या विक्रमी प्रवासादरम्यान एक अत्यंत उत्कंठावर्धक आणि काहीसा चिंताजनक टप्पाही आला. ओरायन यानाने जेव्हा चंद्राच्या पलीकडील भागात (Far Side of the Moon) प्रवेश केला, तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागामुळे रेडिओ लहरी अडथळा ठरल्या आणि यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तब्बल ४० मिनिटांसाठी पूर्णपणे तुटला. नासाच्या शास्त्रज्ञांना हा संपर्क तुटणार याची पूर्वकल्पना होती. याच ४० मिनिटांच्या कालावधीत ओरायन यान पृथ्वीपासून २ लाख ५२ हजार ७५६ मैल (सुमारे ४ लाख ६ हजार ७७१ किलोमीटर) या सर्वाधिक अंतरावर पोहोचले होते. हे आजवरच्या मानवी इतिहासातील पृथ्वीपासूनचे सर्वोच्च अंतर ठरले आहे. हा टप्पा गाठल्यानंतर यान पुन्हा पृथ्वीच्या दिशेने वळले.

मोहिमेचे स्वरूप आणि अंतराळवीरांची चमू-
दहा दिवसांच्या या ऐतिहासिक ‘फ्लाय-बाय’ (Fly-by) मोहिमेत एकूण चार अंतराळवीर सहभागी आहेत. यामध्ये नासाचे रिड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि ख्रिस्तीना कोच या तीन अमेरिकन अंतराळवीरांसह कॅनडाचे जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे. ही मोहीम चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी असून, यात अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार नाहीत. तथापि, चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ ४ हजार ६७ मैल अंतरापर्यंत जवळ जाऊन ते चंद्राच्या त्या भागाचे निरीक्षण करतील, जो भाग पृथ्वीवरून कधीही दिसत नाही. या प्रवासात त्यांना अवकाशातून सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य पाहण्याचीही दुर्मिळ संधी मिळणार आहे.

प्रवासाचा मार्ग आणि उद्दिष्ट-
१ एप्रिल २०२६ रोजी केनेडी अवकाश तळावरून नासाच्या ‘स्पेस लाँच सिस्टीम’ (SLS) या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटच्या साहाय्याने ओरायन यानाने अवकाशात झेपावले होते. पृथ्वीची कक्षा यशस्वीपणे पार केल्यानंतर रॉकेट यानापासून वेगळे झाले आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या