Home / महाराष्ट्र / Anjali Damania : अजित पवारांच्या घराबाहेर जादुटोणा केला तेव्हा भोंदू अशोक खरात ठाण्यात होता ! अंजली दमानियांचा सूचक गौप्यस्फोट

Anjali Damania : अजित पवारांच्या घराबाहेर जादुटोणा केला तेव्हा भोंदू अशोक खरात ठाण्यात होता ! अंजली दमानियांचा सूचक गौप्यस्फोट

Anjali Damania : स्थानिक स्वराज्य निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर 18 नोव्हेंबर 2025 रोजी जादूटोणा...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Anjali Damania : स्थानिक स्वराज्य निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर 18 नोव्हेंबर 2025 रोजी जादूटोणा करण्यात आला होता.  त्यांच्या घराबाहेर लिंबू, नारळ, मिरची, काळे कापड असे टाकले होते. त्याच्या आदल्याच रात्री म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 रोजी भोंदू अशोक खरात ठाण्यात आला होता. 18 नोव्हेंबरला जादूटोण्याचा प्रकार उघड झाला. त्या दिवशीही खरात ठाण्यातच होता. ठाणे पश्चिम येथील एका रेस्टॉरंटमध्ये तो बसला होता, त्याच 18 तारखेला खरातने 6 आर्थिक करार केले असा सूचक गौप्यस्फोट आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांचे भोंदू खरातसोबतचे फोटो दाखवत, शिंदे गट खरातच्या इतका जवळ का होता याचा एसआयटीने कसून तपास करावा, अशी मागणीही दमानिया यांनी केली.


दमानिया यांनी आज खरातशी जवळीक असलेल्या काही राजकीय नेत्यांचे खरातसोबतचे फोटो दाखवले. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार दीपक केसरकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा समावेश होता. हे फोटो दाखवत दमानिया यांनी सवाल केला की, खरातशी एकनाथ शिंदे गटाची एवढी जवळीक का होती याचा तपास पोलिसांनी अद्याप का केला नाही?


शिंदे गटातील नेत्यांचे खरातशी असलेले घनिष्ठ संबंध, आपण सिद्धपुरुष असल्याचा खरातचा दावा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर 18 नोव्हेंबर 2025 रोजी अजित पवार यांच्या घराजवळ करण्यात आलेला जादुटोण्याचा प्रकार, त्याच दिवशी खरातचे ठाण्यात ठाण मांडून बसणे, त्याच दिवशी खरातशी संबंधित समता पतसंस्थेत अवघ्या 34 सेकंदांत  6 मोठे आर्थिक व्यवहार झाले आणि अजित पवार यांचा ज्या दिवशी अपघातात मृत्यू झाला त्यादरम्यान समता पतसंस्थेत  तब्बल 5 कोटी 33 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार हा सारा घटनाक्रम पाहता यावरून अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूशी काही तरी संबंध आहे, असा संशय निर्माण होतो.


अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी मृत्यू झाला, त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 27 जानेवारीपासून 31 जानेवारी या कालावधीत समता पतसंस्थेत 5 कोटी 33 लाखांची अफाट उलाढाल झाली,असा दावा करताना दमानिया यांनी या कालावधीत समता पतसंस्थेत झालेल्या बँकिंग व्यवहाराची प्रत माध्यमांना दाखवली.एवढे सर्व काही स्पष्ट दिसत असताना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याची गंभीर दखल घेऊन सखोल तपास करायला हवा होता.परंतु तसे काहीच होताना दिसले नाही, असे दमानिया म्हणाल्या.


आमदार दीपक केसरकर यांचा विश्वासू साथीदार असलेल्या दीपक लोंढे याचे भोंदू खरातशी जवळचे संबंध होते , त्यांचा खरातशी 189 वेळा फोन संपर्क झाला. हे जगजाहीर झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. केसरकर त्यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्षाचे नेते आहेत,म्हणून फडणवीस त्यांना पाठीशी घालू पहात आहेत का,असा सवालही दमानिया यांनी केला.


खरात प्रकरणामुळे बदनाम झालेल्या आणि दोन महत्वाच्या पदांवरून गच्छंती झालेल्या रुपाली चाकणकर यांनी काल सोशल मीडियावर पोस्ट करून दिलेल्या स्पष्टीकरणाचाही दमानिया यांनी समाचार घेतला.खरातला सर्वाधिक फोन कॉल करणार्‍या पहिल्या दहा लोकांमध्ये रुपाली चाकणकर दुसर्‍या क्रमांकावर आहेत. खरातच्या फोन कॉल रेकॉर्डमधून असे दिसून आले की खरात  आणि चाकणकर यांच्यात एकूण 177 फोन कॉल झाले.त्यापैकी 119 इनकमिंग कॉल (चाकणकर यांनी खरातला केलेले) तर 58 आऊटगोईंग कॉल (खरातने चाकणकर यांना केलेले) होते.एवढे उठता बसता फोन कॉल या दोघांमध्ये का झाले याची चौकशी अद्याप करण्यात आलेली नाही.याची चौकशी झाली तर चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून खरात यांच्यासोबत नेमके काय चालले होते हे जनतेसमोर येईल,असे दमानिया म्हणाल्या.


विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकार्‍यांनी खरातचे प्रस्थ वाढवले आणि त्याला सातत्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. खरातची पत्नी कल्पना खरात आणि मुलगा हर्षवर्धन यांना फरार होण्यास  यांनीच मदत केली,असा आरोप दमानिया यांनी केला. खरातची भोंदूगिरी ,त्याने शेकडो महिलांचे केलेले लैंगिक शोषण , बेकायदेशीरपणे केलेले जमिनी खरेदीचे व्यवहार आणि जमवलेली अब्जावधींची माया हे सारे उघड झाल्यानंतर पोलिसांनी खरातच्या कुटुंबियांवर पाळत ठेवणे आवश्यक होते.मात्र पोलिसांनी पाळत ठेवली नाही.त्यांना पळून जाण्यास मदत केली.यामागे भाजपाशी संबंधित नेते आणि अधिकार्‍यांचा हात आहे,हे स्पष्ट आहे,असे दमानिया म्हणाल्या.


दमानिया यांनी आज म्हटले की खरात यांना फोन करणार्‍यांमध्ये तृप्ती, रूपाली चाकणकर, दीपक लोंढे, पत्नी कल्पना, बोराडे, नंदकिशोर काटोरे , सचिन चोंबाळे हे अग्रक्रमी आहेत . याशिवाय दादा भुसे यांचे पीए, विखे पाटील यांचे विशेष अधिकारी राहुल कोतडे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, राहुल देशमुख, सिन्नर एमआयडीसीचे अधिकारी अविनाश पोटे, महिंद्र शेळके पाटील, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस, आरटीओ हे सर्व खरातच्या संपर्कात होते असे आज दमानिया म्हणाल्या.

उपजिल्हाधिकारी भांडे-पाटीलची
चौकशी करा! ते मदत करतात

आधी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसनमध्ये असलेले आणि आता दुसरीकडे नेमणूक झालेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांना नोकरीवरून काढून त्यांची चौकशी करा, अशी मागणी करत अंजली दमानिया म्हणाल्या की, या भांडे-पाटील यांच्याकडे दोन फोन आहेत, त्यातील एका फोनवरून त्याने खरातला 143 कॉल केले तर दुसर्‍या फोनवरून 53 कॉल केले. याच भांडे-पाटीलने खरातची फरार पत्नी कल्पना व मुलगा हर्षवर्धन याला संरक्षण दिले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या