Home / देश-विदेश / अक्षय तृतीयेला चारधाम यात्रा सुरूगंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडले

अक्षय तृतीयेला चारधाम यात्रा सुरूगंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडले

Chardham yatra-अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे उघडल्याने आज चारधाम यात्रेला अधिकृतपणे सुरुवात झाली. वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Chardham yatra-अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे उघडल्याने आज चारधाम यात्रेला अधिकृतपणे सुरुवात झाली. वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि ‘जय मां गंगा’च्या घोषात गंगोत्री धामाचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. परंपरेनुसार, केदारनाथ मंदिराचे दरवाजे २२ एप्रिल रोजी आणि बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे २३ एप्रिल रोजी उघडले जातील. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक चारधामच्या दर्शनासाठी येतात.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे स्वतः या गंगोत्रीच्या सोहळ्यात उपस्थित होते. दरवाजे उघडताना हजारो भाविक मंदिर परिसरात उपस्थित होते. ‘हर हर गंगे’ आणि ‘मां गंगा की जय’च्या जयघोषांनी संपूर्ण गंगोत्री धाम दुमदुमून गेले. ठरलेल्या मुहूर्तानुसार दुपारी १२.१५ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून फुलांची वर्षावही करण्यात आली. आज पहाटेच भैरव घाटी येथून माता गंगेची उत्सव डोली गंगोत्री धामाकडे रवाना झाली. त्यापूर्वी भैरव घाटीत विशेष पूजा-अर्चना करण्यात आली. मंदिर समितीचे सचिव सुरेश सेमवाल यांनी सांगितले की, विधिवत गंगा पूजन, गंगा सहस्रनाम पाठ आणि विशेष पूजा केल्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात देश-विदेशातील भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी गंगोत्री धामात दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली.

काल दुपारी अभिजित मुहूर्तावर माता गंगेची भोगमूर्ती डोलीतून गंगोत्री धामाकडे रवाना झाली होती. मुखबा गावातील ग्रामस्थांनी पारंपरिक विधी करत माता गंगेला निरोप दिला. आर्मी बँड, ढोल-दमाऊ आणि समेश्वर देवतेच्या देवडोलीच्या अग्रभागी ही डोली गंगोत्रीकडे रवाना झाली.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या