Dhruv Jurel Video: आयपीएल 2026 मध्ये रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात थरारक सामना रंगला. या सामन्यात कोलकाताने विजय मिळवला असला तरी, राजस्थानच्या ध्रुव जुरेलने आपल्या चपळाईने सर्वांची मने जिंकली.
ध्रुवने ज्या पद्धतीने कॅमेरून ग्रीनला बाद केले, त्याचे वर्णन करण्यासाठी क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही शब्दांचा आधार घेतला आहे.
डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच…
कोलकाताच्या डावातील 5 व्या षटकात रवी बिश्नोई गोलंदाजी करत होता. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या कॅमेरून ग्रीनने मोठा फटका मारण्यासाठी क्रीज सोडली. बिश्नोईने लेग साइडला टाकलेला चेंडू ग्रीनला हुलकावणी देऊन मागे गेला. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने अत्यंत वेगाने डावीकडे झेप घेत चेंडू पकडला आणि हवेत असतानाच यष्ट्यांवर अचूक फेकला. विशेष म्हणजे, यष्ट्यांकडे न पाहताही त्याचा निशाणा अचूक लागला आणि ग्रीनला क्रीजमध्ये परतण्याची संधीच मिळाली नाही.
THAT’s SOME STUMPING! 🤯
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
🎥 Dhruv Jurel off balance & diving away from the stumps but hits the target 🎯
Updates ▶️ https://t.co/776nTdPbPj#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/lqjSajx2iO
सचिन तेंडुलकरने काय म्हटले?
ध्रुवच्या या अफलातून स्टंपिंगचा फोटो शेअर करत सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक केले. सचिनने लिहिले, “समोर केवळ एकच यष्टी दिसत असताना, हवेत झेप घेऊन डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच काम फत्ते! ध्रुव जुरेल, खरंच अप्रतिम!” सचिनसोबतच अनुभवी फिरकीपटू रवी अश्विननेही ध्रुवच्या या यष्टीरक्षणाचे कौतुक केले आहे.
सामन्याचा निकाल
या स्टंपिंगमुळे कोलकाताची अवस्था 4.3 षटकांत 37/4 अशी झाली होती आणि राजस्थानने सामन्यावर पकड मिळवली होती. ग्रीनने 13 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोलकाताने दमदार पुनरागमन केले आणि राजस्थान रॉयल्सचा 4 विकेट्सनी पराभव करत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या ध्रुवने आपल्या यष्टीरक्षणाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हे देखील वाचा –











