Home / महाराष्ट्र / Pune Crime News : “त्या महिलेने अफवा पसरवली- “मी फक्त नातीसोबत बसलो होतो…” पुण्याच्या पर्वतीमधील नराधम आजोबांचं कोर्टात निर्लज्ज उत्तर

Pune Crime News : “त्या महिलेने अफवा पसरवली- “मी फक्त नातीसोबत बसलो होतो…” पुण्याच्या पर्वतीमधील नराधम आजोबांचं कोर्टात निर्लज्ज उत्तर

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या पर्वती पायथा परिसरात एका ७०...

By: Team Navakal
Pune Crime News
Social + WhatsApp CTA

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या पर्वती पायथा परिसरात एका ७० वर्षीय नराधमाने आपल्याच अल्पवयीन नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, संतप्त नागरिकांनी मध्यरात्रीपर्यंत रस्ता रोको करून आपला निषेध व्यक्त केला.

प्रसंगावधान आणि पुढील अनर्थ टळला-
मंगळवारी रात्री पर्वती परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत पीडित चिमुरडीचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज बाहेर आला. त्याच वेळी तिथून जात असलेल्या एका महिलेने हा आवाज ऐकला. तिने तत्काळ घराच्या दिशेने धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पर्वती पोलिसांनी ७० वर्षीय नराधम आजोबाविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

नराधमाचा न्यायालयात मुजोर पवित्रा-
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याने अत्यंत निर्लज्जपणे आपली बाजू मांडली. “मी नातीसोबत फक्त बसलो होतो, शेजारच्या महिलेने माझ्याबद्दल अफवा पसरवली,” असे उत्तर देऊन त्याने न्यायालयात स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांनी त्याच्या या दाव्यातील फोलपणा उघड केला. आरोपीच्या छातीवर पीडित मुलीच्या नखांचे ओरखडे आणि ओठांवर चावल्याचे व्रण असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

पोलीस तपास आणि कोठडी-
सरकारी वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे आणि त्याने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य इतर कोणासोबत केले आहे का, याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. पीडित मुलीवर त्याने याआधीही अशा प्रकारचा प्रसंग ओढवला होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीला शुक्रवार, ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस प्रशासनाची माहिती-
पर्वती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पीडित मुलीची प्रकृती आता स्थिर असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ५ मे रोजी रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली होती. सध्या परिसरातील परिस्थिती शांत असून पोलीस या संवेदनशील प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या