PM Kisan Yojana 23rd installment date : देशातील कोट्यवधी बळीराजा आता ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधि’ (PM Kisan) योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येक वेळच्या प्रथेप्रमाणे, यंदाही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २,००० रुपये थेट जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारखेची घोषणा केली नसली तरी, गेल्या काही वर्षांतील नोंदीनुसार हा हप्ता जून किंवा जुलै २०२६ मध्ये जारी होण्याची दाट शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मार्च २०२६ रोजी आसाममधील गुवाहाटी येथून २२ व्या हप्त्याचे वितरण केले होते. त्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष २३ व्या हप्त्याच्या तारखेकडे लागले आहे.
PM Kisan Yojana : काय आहे ही योजना?
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात (DBT) पाठवली जाते. शेतीशी संबंधित दैनंदिन खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना या पैशांचा मोठा आधार मिळतो.
PM Kisan Yojana : हप्ता मिळवण्यासाठी या २ गोष्टी अनिवार्य
जर तुम्हाला पुढील हप्ता विना अडथळा मिळवायचा असेल, तर दोन महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे:
- e-KYC: सर्व शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे आहे. तुम्ही ओटीपीद्वारे ऑनलाइन किंवा सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने हे काम करू शकता.
- आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे, अन्यथा तांत्रिक कारणास्तव पैसे जमा होणार नाहीत.
PM Kisan Yojana : तुमचे नाव यादीत आहे का? असे तपासा ‘स्टेटस’:
- सर्वात आधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (pmkisan.gov.in) जा.
- येथे ‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून कॅप्चा कोड भरा.
- ‘Get Data’ वर क्लिक करताच तुमच्या हप्त्यांची सर्व माहिती समोर येईल.
PM Kisan Yojana : या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात?
योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने काही कडक पावले उचलली आहेत. ज्यांनी १ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी केली आहे किंवा एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहेत, अशांचे हप्ता रोखले जाऊ शकतात. पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळत असल्यास प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत पेमेंट थांबवले जाऊ शकते.
हे देखील वाचा – West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा











