Home / महाराष्ट्र / Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 15 मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू; पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 15 मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू; पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Water Cut: मुंबईवर जलसंकटाचे सावट असून खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला...

By: Team Navakal
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 15मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू; पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
Social + WhatsApp CTA

Mumbai Water Cut: मुंबईवर जलसंकटाचे सावट असून खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मे २०२६ पासून ही कपात लागू होणार असून, आगामी मान्सूनबाबतचे अनिश्चित अंदाज आणि धरणांतील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

Mumbai Water Cut: पाणीकपातीचे मुख्य कारण काय?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये सध्या पाणीसाठा कमी होत आहे. ११ मे २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, धरणांमध्ये केवळ २३.५२ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. हवामान खात्याने पुढील वर्षी ‘अल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली असून, मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून जलसंपदा विभागाने दिलेल्या सूचनेनुसार पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनी घाबरून जाण्याची गरज नाही

पाणीकपात लागू होत असली तरी मुंबईकरांनी चिंता करू नये, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

  • उपलब्ध साठा: सध्या धरणांमध्ये ३,४०,३९९ दशलक्ष लीटर पाणी आहे.
  • अतिरिक्त साठा: भातसा धरणातून १,४७,०९२ दशलक्ष लीटर आणि अप्पर वैतरणा धरणातून २०,००० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मुंबईसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन केवळ खबरदारी म्हणून हे नियोजन करण्यात आले आहे.

Mumbai Water Cut: ठाणे आणि भिवंडीलाही फटका

मुंबई महापालिकेकडून ज्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्येही कपात करण्यात येणार आहे. १५ मे पासून ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि इतर संबंधित ग्रामीण भागांतही १० टक्के पाणी कमी मिळणार आहे. समाधानकारक पाऊस होऊन धरणांतील साठ्यात सुधारणा होईपर्यंत ही कपात सुरूच राहणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाने सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, दैनंदिन कामात पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा.

हे देखील वाचा – PM Modi’s Appeal: “विदेशी चलन वाचवा!”; पंतप्रधान मोदींचे इंधन बचत आणि सोनं खरेदी टाळण्याचे देशवासीयांना पुन्हा एकदा आवाहन

Web Title:
संबंधित बातम्या