Home / देश-विदेश / Cockroach Janta Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नक्की काय आहे? कोणी केली या पक्षाची स्थापना? जाणून घ्या

Cockroach Janta Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नक्की काय आहे? कोणी केली या पक्षाची स्थापना? जाणून घ्या

Cockroach Janta Party : भारतीय राजकारणात आतापर्यंत भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांचाच दबदबा राहिला आहे. पैसा आणि ताकदीच्या बळावर चालणाऱ्या...

By: Team Navakal
Cockroach Janta Party : 'कॉक्रोच जनता पार्टी' नक्की काय आहे? कोणी केली या पक्षाची स्थापना? जाणून घ्या
Social + WhatsApp CTA

Cockroach Janta Party : भारतीय राजकारणात आतापर्यंत भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांचाच दबदबा राहिला आहे. पैसा आणि ताकदीच्या बळावर चालणाऱ्या या राजकारणामुळे अनेक तरुण राजकारणापासून दूर जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाचे चित्र अचानक बदलले आहे.

इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या ट्रेंडी रिल्स, मिम्स आणि राजकीय पोस्टचा महापूर आला आहे. या संपूर्ण वादळाच्या केंद्रस्थानी एक नवा पक्ष आहे, ज्याचे नाव ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) असे आहे. पुण्यातील एका ३० वर्षांच्या तरुणाने सुरू केलेल्या या डिजिटल पक्षाला अवघ्या काही दिवसांत १ लाखाहून अधिक लोकांनी जॉईन केले असून, या पक्षाची अधिकृत वेबसाईट आणि एक अँथम गाणे देखील रिलीज झाले आहे.

Cockroach Janta Party :कोण आहे या पक्षाचा संस्थापक?

या नव्या मोहिमेमागे अभिजीत दिपके नावाच्या ३० वर्षीय डिजिटल स्ट्रॅटेजिस्टचा मेंदू आहे.

  • शिक्षण: अभिजीतने पुण्यामधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्सचे उच्च शिक्षण घेत आहे.
  • राजकीय अनुभव: २०२० ते २०२३ दरम्यान अभिजीत आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया टीमचा एक महत्त्वाचा भाग होता. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मिळालेल्या विजयात मिम्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्यानंतर वैयक्तिक प्रगती आणि आर्थिक स्थैर्यासाठी त्याने ही नोकरी सोडली आणि तो अमेरिकेला गेला.

Cockroach Janta Party : पक्ष स्थापन करण्याचे मुख्य कारण काय?

काही दिवसांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉक्रोच’ म्हणजेच झुरळांशी केली होती. व्यावसायिक क्षेत्रात जागा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि बेरोजगारीचा सामना करणाऱ्या तरुणांविषयी त्यांनी हे विधान केले होते.

नंतर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असून ते फक्त बनावट पदव्या घेऊन वकिलीत येणाऱ्या लोकांबद्दल बोलत होते. मात्र, देशाच्या संविधानाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीकडून असा शब्द ऐकल्यामुळे अभिजीत खूप दुखावला गेला. “मी स्वतः एक झुरळ आहे आणि सरन्यायाधीश माझ्याबद्दलच बोलत होते,” असे मानून त्याने या संतापातून उपरोधिकपणे हा पक्ष स्थापन केला.

Cockroach Janta Party : पक्षाचा अनोखा जाहीरनामा

या पक्षाने आपल्या वेबसाईटवर ‘आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज’ असे स्वतःचे वर्णन केले असून ५ प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत:

  • निवृत्तीनंतर कोणत्याही सरन्यायाधीशांना राज्यसभेची जागा बक्षीस म्हणून दिली जाणार नाही.
  • निवडणूक आयोगाने कोणत्याही मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळल्यास त्यांच्यावर थेट कडक कारवाई केली जाईल.
  • महिलांना राजकारणात आणि नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले जाईल.
  • मोठ्या उद्योगपतींच्या मालकीच्या मीडिया हाऊसेसचे परवाने रद्द केले जातील.
  • पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही आमदार किंवा खासदाराला पुढील २० वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाईल.

Cockroach Janta Party : पक्षात प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता काय?

या डिजिटल पक्षात सामील होण्यासाठी अतिशय मजेशीर आणि सोपे नियम ठेवण्यात आले आहेत. उमेदवार सक्तीने किंवा स्वतःच्या इच्छेने बेरोजगार असावा, त्याचा मेंदू सतत विचार करत असावा, तो दिवसातून किमान ११ तास ऑनलाईन असावा आणि सिस्टीममधील त्रुटींवर धारदार युक्तिवाद करण्यात पटाईत असावा. हा पक्ष अधिकृतपणे नोंदणीकृत नसला, तरी या निमित्ताने देशातील बेरोजगारी आणि पेपर लीक सारख्या गंभीर मुद्द्यांवर तरुणांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या