Samsung Galaxy S25 FE Price Drop: तुम्ही जर सॅमसंगचा एखादा दमदार फीचर्स असलेला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सध्या ‘सॅमसंग गॅलेक्सी S25 FE’ या फोनवर प्रचंड सवलत दिली जात आहे.
हा स्मार्टफोन सप्टेंबर २०२५ मध्ये ६५,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र, सध्या फ्लिपकार्टवर याचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट अवघ्या ४५,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर बँक ऑफर्सचा वापर करून ग्राहक यावर अधिक बचत करू शकतात.
Samsung Galaxy S25 FE Price Drop: बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा दुहेरी फायदा
ग्राहकांना हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करता यावा म्हणून फ्लिपकार्टने काही भन्नाट ऑफर्स दिल्या आहेत:
- बँक डिस्काउंट: फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास युझर्सना २,३०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत ४३,६९९ रुपये होईल.
- एक्सचेंज ऑफर: तुमच्याकडे एखादा जुना किंवा चालू असलेला स्मार्टफोन असेल, तर तो एक्स्चेंज करून तुम्ही ३५,०५० रुपयांपर्यंतची मोठी बचत करू शकता. (एक्सचेंज बोनस हा जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल).
Samsung Galaxy S25 FE Price Drop: ब्राइटनेस आणि डिस्प्ले दमदार
या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने स्क्रीन आणि डिझाईनच्या बाबतीत कोणतीही कसर सोडलेली नाही. यामध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डायनॅमिक अॅमोलेड २एक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १,९०० निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो, ज्यामुळे कडक उन्हातही स्क्रीनवरील अक्षरे अगदी स्पष्ट दिसतात.
फोनच्या सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी कंपनीने यामध्ये ७ वर्षांचे ऑपरेटिंग सिस्टीम आणि सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. हा फोन अँड्रॉइड १६ वर आधारित वन युआय ८ वर काम करतो.
Samsung Galaxy S25 FE Price Drop: फ्लॅगशिप प्रोसेसर आणि एडव्हान्स AI फीचर्स
- पॉवरफुल परफॉर्मन्स: गॅलेक्सी S25 FE मध्ये सॅमसंगचा स्वतःचा इन-हाऊस एक्झिनॉस २४०० प्रोसेसर देण्यात आला आहे, जो हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंग सहज सांभाळतो.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स: या फोनमध्ये गुगलचे सर्कल टू सर्च, जेमिनी लाईव्ह आणि जनरेटिव्ह एडिट सारखे अनेक एडव्हान्स एआय फीचर्स मिळतात, जे फोटोग्राफी आणि दैनंदिन कामे सोपी करतात.
- बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये ४,९००एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी ४५वॉट वायर्ड आणि १५वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy S25 FE Price Drop: कॅमेरा सेटअप आणि इतर वैशिष्ट्ये
फोटोग्राफीसाठी फोनच्या पाठीमागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी समोर १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आयपी६८ रेटिंगसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, वाय-फाई, ब्लूटूथ आणि युएसबी टाईप सी पोर्ट यांसारखे सर्व आवश्यक पर्याय उपलब्ध आहेत. या फोनचे वजन अवघे १९० ग्राम आहे.
हे देखील वाचा – Cockroach Janta Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नक्की काय आहे? कोणी केली या पक्षाची स्थापना? जाणून घ्या










