Home / देश-विदेश / K. Annamalai Party : भाजपामधून बाहेर पडताच अण्णामलाईंचा करिष्मा; इधु नम्मा इयक्कमची धडाकेबाज सुरुवात

K. Annamalai Party : भाजपामधून बाहेर पडताच अण्णामलाईंचा करिष्मा; इधु नम्मा इयक्कमची धडाकेबाज सुरुवात

K. Annamalai Party : तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या माजी भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई (K. Annamalai Party) यांनी पक्षाचा...

By: Team Navakal
K. Annamalai Party
Social + WhatsApp CTA
K. Annamalai Party : तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या माजी भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई (K. Annamalai Party) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच नवा राजकीय इतिहास रचला आहे. 'इधु नम्मा इयक्कम' (Idhu Namma Iyakkam) या नव्या राजकीय पक्षाची घोषणा होताच जनतेकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून अवघ्या १० तासांत १० लाखांहून अधिक लोकांनी पक्षात नोंदणी केली आहे. तर २४ तासांच्या आत सुमारे १३ लाख ८५ हजारांपेक्षा अधिक नागरिक या नव्या चळवळीशी जोडले गेल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला आहे.

https://x.com/annamalai_k/status/2063162658442838461?s=20

तमिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता असलेल्या या घडामोडीमुळे राज्यातील राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. अण्णामलाई यांनी या पक्षाला केवळ राजकीय संघटना नसून लोकांचे आंदोलन (People's Movement) असे संबोधले आहे. राज्याच्या विकासासाठी आणि तमिळ अस्मितेसाठी ही नवी चळवळ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपााचा राजीनामा आणि नव्या पक्षाची घोषणा

https://x.com/annamalai_k/status/2062795258824663072?s=20

अण्णामलाई यांनी २ जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ५ जून रोजी त्यांनी 'इधु नम्मा इयक्कम' या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत असून भाजपााचे तमिळनाडू प्रदेश उपाध्यक्ष करू नागराजन यांनीही पक्षाचा राजीनामा देत अण्णामलाई यांना साथ दिली आहे.

पक्षाच्या स्थापनेनंतर बोलताना अण्णामलाई म्हणाले, "ही केवळ राजकीय सुरुवात नाही, तर तमिळनाडूच्या भविष्याशी संबंधित मोठी चळवळ आहे. आमचा पक्ष २०३१ ची विधानसभा निवडणूक लढवेल आणि राज्याच्या राजकारणात पर्याय निर्माण करेल."

याचबरोबर त्यांनी 'वी द लीडर्स' (We The Leaders) हे व्यासपीठ सुरू करण्याची घोषणा केली. तसेच कोयंबतूर येथे 'एपीजे अब्दुल कलाम सेंटर फॉर एथिक्स अँड पॉलिटिक्स' (APJ Abdul Kalam Centre for Ethics and Politics) स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

दिल्लीतील गोपनीय बैठकीत काय घडले?

राजीनाम्यापूर्वी अण्णामलाई यांनी २ जून रोजी दिल्लीत भाजपााचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पाच पानांचे राजीनामा पत्र सादर केले.

यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची अत्यंत गोपनीय बैठक (Confidential Meeting) झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत अण्णामलाई यांनी पक्ष सोडण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली होती.

बैठकीनंतर अण्णामलाई दिल्ली विमानतळावरून चेन्नईला रवाना होणार होते. मात्र, विमानात बसण्यापूर्वीच त्यांना भाजपा नेतृत्वाचा फोन आला आणि पुन्हा पक्ष मुख्यालयात बोलावण्यात आले. वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा शेवटचा प्रयत्न केला, परंतु अण्णामलाई आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर पक्ष नेतृत्वाला त्यांचा राजीनामा स्वीकारावा लागला.

अण्णामलाईंनी भाजपा का सोडली?

कर्नाटक कॅडरचे माजी आयपीएस (IPS) अधिकारी असलेले के. अण्णामलाई यांनी २०२० मध्ये सरकारी सेवेला रामराम ठोकत भाजपाामध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याचे अनेकदा सांगितले होते.

भाजपामध्ये प्रवेशानंतर अल्पावधीतच त्यांना तमिळनाडू प्रदेश उपाध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून पक्ष नेतृत्वाशी विविध मुद्द्यांवर मतभेद वाढत असल्याचे सांगितले जाते.


राज्यसभा तिकीट नाकारल्याची नाराजी

राज्यसभेच्या उमेदवारीवरून अण्णामलाई नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांना आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, भाजपााने आपल्या कोट्यातील जागा तेलुगू देसम पक्षाला (TDP) दिल्याने अण्णामलाईंची संधी हुकली. यामुळे त्यांच्यात नाराजी वाढल्याचे सांगितले जाते.

एआयएडीएमकेसोबतच्या युतीवर आक्षेप

भाजपा आणि अण्णाद्रमुक (AIADMK) यांच्यातील युतीबाबतही अण्णामलाई यांचे मतभेद होते. या युतीमुळे भाजपााची स्वतंत्र ओळख कमकुवत झाली आणि मतांची टक्केवारी वाढवण्यात पक्षाला अपयश आल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद

राजीनाम्यानंतर अण्णामलाई यांनी स्पष्टपणे सांगितले की, गेल्या १८ महिन्यांपासून तमिळनाडूतील राजकीय रणनीती (Political Strategy) आणि पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत त्यांचे केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद होते. तमिळनाडूच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या राजकारणाबाबत आमचे विचार जुळत नव्हते. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला," असे त्यांनी म्हटले.


निवडणुका होऊ द्या, मग पक्ष सोडा'

अण्णामलाई यांनी आपल्या राजीनामा पत्रात आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी ४ डिसेंबर २०२५ रोजीच पक्ष नेतृत्वाला राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी त्यांना "आधी निवडणुका संपू द्या आणि त्यानंतर निर्णय घ्या" असा सल्ला देण्यात आला होता.अखेर २ जून २०२६ रोजी त्यांनी अधिकृतपणे भाजपााचा राजीनामा दिला आणि काही दिवसांतच नव्या राजकीय प्रवासाची घोषणा केली.


भाजपाामधील प्रवास




अण्णामलाई यांनी २०२० मध्ये आयपीएस सेवेला राजीनामा देत भाजपाामध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०२१ आणि २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपााच्या मतांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. पक्षाचा मतांचा वाटा दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढवण्यात अपयश आल्याचे आकडेवारीतून दिसून आले.

तरीही राज्यभरात अण्णामलाई यांची लोकप्रियता सातत्याने वाढत गेली. आता भाजपाामधून बाहेर पडताच त्यांच्या नव्या पक्षाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, तमिळनाडूच्या राजकारणात एक नवा पर्याय उभा राहत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात अण्णामलाईंचा हा राजकीय प्रयोग किती यशस्वी ठरतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


हे देखील वाचा :

मुंबईत पुन्हा ‘नेस्को’सारखीच घटना…. वरळी डोमच्या कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, तरुणी अत्यवस्थ

कॉक्रोच जनता पार्टी’च्या जंतर-मंतरवरील आंदोलना अपयश; दिल्लीतील ५ तासांच्या ड्रामाचा असा झाला शेवट!

डीआरडीओमध्ये वैज्ञानिक होण्याची सुवर्णसंधी! मिळणार बंपर पगार; 19 जूनपूर्वी करा अर्ज

Web Title:
For more updates: , , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या