Home / लेख / Smart TV Deals: 55 इंचाचे 5 दमदार स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त; अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवर थेट अर्ध्या किमतीत खरेदीची संधी

Smart TV Deals: 55 इंचाचे 5 दमदार स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त; अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवर थेट अर्ध्या किमतीत खरेदीची संधी

Smart TV Deals: जर तुम्ही तुमच्या घरासाठी एका मोठ्या स्क्रीनचा म्हणजेच 55 इंचाचा नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत...

By: Team Navakal
Smart TV Deals: 55 इंचाचे 5 दमदार स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त; अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवर थेट अर्ध्या किमतीत खरेदीची संधी
Social + WhatsApp CTA

Smart TV Deals: जर तुम्ही तुमच्या घरासाठी एका मोठ्या स्क्रीनचा म्हणजेच 55 इंचाचा नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच अगदी योग्य वेळ आहे. सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर जबरदस्त ऑफर्स आणि बंपर डिस्काउंट दिला जात आहे.

विशेष म्हणजे या सेलमध्ये सोनी, एलजी आणि सॅमसंग सारख्या प्रीमियम ब्रँड्सचे मॉडेल्स अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. याशिवाय बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसचा फायदा घेऊन तुम्ही हे टीव्ही आणखी स्वस्तात घरी आणू शकता. बजेटमध्ये बसणाऱ्या ५ सर्वोत्तम स्मार्ट टीव्हीची नवीन यादी खालीलप्रमाणे आहे:

१. Realme TechLife 55 inch QLED Ultra HD

या यादीतील सर्वात स्वस्त आणि उत्तम फीचर्ससह येणारा हा रियलमीचा टीव्ही आहे. दमदार स्क्रीन अनुभवासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

  • किंमत: या टीव्हीची मूळ किंमत 65,399 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर हा थेट अर्ध्या किमतीत म्हणजेच अवघ्या 30,999 रुपयांना मिळत आहे.
  • बँक ऑफर्स: फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवर 1,550 रुपये आणि बँक ऑफ बडोदा कार्डवर 2,150 रुपयांची सूट मिळते, ज्यामुळे याची प्रभावी किंमत 29,450 रुपये होते.

२. Xiaomi 54.3 inch FX Pro QLED 4K Smart Fire TV

शाओमीचा हा कडक मॉडेल अ‍ॅमेझॉनवर मोठ्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

  • किंमत: या टीव्हीची नेहमीची किंमत 62,999 रुपये आहे, पण सध्या अ‍ॅमेझॉनवर तो फक्त 36,999 रुपयांना लिस्ट केला आहे.
  • बँक ऑफर्स: एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंतचा थेट डिस्काउंट आणि कूपनद्वारे अतिरिक्त 1,000 रुपयांची बचत करता येईल.

३. Samsung 54.3 inches Crystal 4K Vista Ultra HD

सॅमसंगच्या डिस्प्ले क्वालिटीचे लाखो फॅन्स आहेत. हा क्रिस्टल 4K टीव्ही देखील सध्या बजेट किमतीत खरेदी करता येईल.

  • किंमत: मूळ किंमत 55,200 रुपये असलेला हा ब्रँडेड टीव्ही अ‍ॅमेझॉनवर 40,990 रुपयांना उपलब्ध आहे.
  • बँक ऑफर्स: या डीलमध्ये ग्राहकांना 4,000 रुपयांचे स्पेशल कूपन डिस्काउंट आणि बँक ऑफरच्या मदतीने आणखी 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

४. LG AI NANO NU87 55 inch Ultra HD

एलजीचा हा प्रगत फिचर्स असलेला एआय (AI) टीव्ही फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी मोठी बचत घेऊन आला आहे.

  • किंमत: या टीव्हीची लिस्टेड किंमत 85,990 रुपये आहे, पण सध्या तो केवळ 45,999 रुपयांना मिळत आहे.
  • बँक ऑफर्स आणि एक्सचेंज: एचडीएफसी क्रेडिट कार्डवर तब्बल 6,900 रुपयांचा मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे. तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस किंवा एसबीआय कार्डवर 5,293 रुपयांची बचत होईल. याशिवाय जुना टीव्ही बदलल्यास 7,320 रुपयांपर्यंतचे सर्वोत्तम एक्सचेंज मूल्य मिळू शकते.

५. Sony 54.6 inch Ultra HD 4K LED Smart Google TV

प्रीमियम श्रेणीत येणारा सोनीचा हा गुगल टीव्ही सिनेमाचा खरा अनुभव देतो. महागडा असला तरी सध्या यावर मोठी रक्कम वाचवता येऊ शकते.

  • किंमत: फ्लिपकार्टवर या टीव्हीची मूळ किंमत 91,900 रुपये आहे, परंतु ऑफर अंतर्गत तो 65,490 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.
  • बँक ऑफर्स: फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक किंवा एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास ग्राहकांना 3,275 रुपयांची थेट सवलत मिळते, ज्यामुळे हा टीव्ही 62,215 रुपयांना खरेदी करता येतो.
Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या