Home / देश-विदेश / वादानंतर NCERT चा मोठा निर्णय! पुस्तकातील ‘डान्सिंग गर्ल’चे वादग्रस्त चित्र बदलणार; मूळ रूप पुन्हा आणणार

वादानंतर NCERT चा मोठा निर्णय! पुस्तकातील ‘डान्सिंग गर्ल’चे वादग्रस्त चित्र बदलणार; मूळ रूप पुन्हा आणणार

NCERT Textbook Update: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटीच्या ९ वीच्या एका नवीन पाठ्यपुस्तकातील चित्रावरून मोठा वाद निर्माण...

By: Team Navakal
NCERT Textbook Update
Social + WhatsApp CTA

NCERT Textbook Update: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटीच्या ९ वीच्या एका नवीन पाठ्यपुस्तकातील चित्रावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सिंधू संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध ‘डान्सिंग गर्ल’ म्हणजेच नृत्यांगनेच्या मूर्तीचे मूळ चित्र बदलून ते पुस्तकात छापण्यात आले होते. या बदलावर इतिहासकार आणि तज्ज्ञांनी तीव्र आक्षेप घेतला होता.

हा वाद वाढल्यानंतर आता एनसीईआरटीने आपली चूक सुधारत मोठा निर्णय घेतला आहे. पुस्तकातील बदललेले वादग्रस्त चित्र हटवून त्या जागी मूर्तीचे मूळ आणि अस्सल चित्र पुन्हा समाविष्ट केले जाणार आहे. एनसीईआरटीचे संचालक दिनेश साकलानी यांनी या निर्णयाला अधिकृत दुजोरा दिला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित विभागाला याची चौकशी करण्यास सांगितले होते आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आता मूळ चित्र परत आणले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेमका काय होता वाद?

हा संपूर्ण वाद एनसीईआरटीने चालू शैक्षणिक वर्षात सुरू केलेल्या ९ वीच्या ‘मधुरिमा’ या कला शिक्षण विषयाच्या पुस्तकावरून सुरू झाला होता:

  • मूळ मूर्तीचे स्वरूप: मोहेनजो-दडो येथे सापडलेली ही प्रसिद्ध कांस्य मूर्ती सुमारे 4,000 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. या मूळ मूर्तीचा वरील भाग (टॉर्सो) विवस्त्र अवस्थेत आहे.
  • पुस्तकातील फेरबदल: ‘आर्ट्सचा इतिहास’ या पहिल्याच प्रकरणात छापलेल्या चित्रात या मूर्तीचा खांद्यापासून खालील भाग सावली किंवा रंगाचा वापर करून झाकण्यात आला होता.
  • आक्षेप: ही ऐतिहासिक मूर्ती जगभरात तिच्या मूळ स्वरूपातच ओळखली जाते. त्यामुळे शैक्षणिक पुस्तकात असा बदल करणे इतिहास आणि पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे असल्याचा आरोप केला जात होता.

ऑनलाईन पुस्तकात लगेच बदल; नवीन छपाईत होणार सुधारणा

एनसीईआरटीने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन पुस्तकांमध्ये (ई-बुक्स) हा बदल तातडीने केला जाईल. तर दुसरीकडे, भविष्यात छापल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या नवीन आवृत्तीत मूळ चित्र समाविष्ट करूनच बाजारात आणले जाईल.

यापूर्वी या विषयावर बोलताना संचालक दिनेश प्रसाद साकलानी यांनी सांगितले होते की, चित्राचा भाग झाकण्यामागे कोणताही विशिष्ट हेतू नव्हता. हे पुस्तक तयार करण्याची जबाबदारी कला आणि शिक्षण विभागाची असल्याने हे प्रकरण त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

४,००० वर्षे जुन्या इतिहासाचे प्रतीक

मोहेनजो-दडो येथील उत्खननात सापडलेली ही ‘डान्सिंग गर्ल’ प्राचीन सिंधू संस्कृतीच्या उत्कृष्ट कलाकुसरीचे आणि प्रगत तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे उदाहरण मानली जाते. दक्षिण आशियाई आणि जागतिक इतिहासात या मूर्तीला अत्यंत मानाचे स्थान आहे. जगभरातील इतिहास, पुरातत्व आणि कला क्षेत्रातील पुस्तकांमध्ये या मूर्तीचा संदर्भ वापरला जातो. त्यामुळे याच्या मूळ स्वरूपाशी केलेली छेडछाड तज्ज्ञांना मान्य नव्हती.

हे देखील वाचा – Abhijit Dipke Attack: “10 वेळा कानाखाली मारली तरी…” जयपूरमधील हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

Web Title:
संबंधित बातम्या