Home / लेख / Samsung चा महागडा 5G फ्लॅगशिप फोन अ‍ॅमेझॉनवर झाला खूप स्वस्त! थेट 27% डिस्काउंट; पाहा बँक ऑफर्स

Samsung चा महागडा 5G फ्लॅगशिप फोन अ‍ॅमेझॉनवर झाला खूप स्वस्त! थेट 27% डिस्काउंट; पाहा बँक ऑफर्स

Samsung Galaxy S25 5G Deal: जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून सॅमसंग कंपनीचा एखादा दर्जेदार आणि प्रीमियम ५G स्मार्टफोन खरेदी करण्याचा...

By: Team Navakal
Samsung चा महागडा 5G फ्लॅगशिप फोन अ‍ॅमेझॉनवर झाला खूप स्वस्त! थेट 27% डिस्काउंट; पाहा बँक ऑफर्स
Social + WhatsApp CTA

Samsung Galaxy S25 5G Deal: जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून सॅमसंग कंपनीचा एखादा दर्जेदार आणि प्रीमियम ५G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट ६0,000 रुपयांच्या आसपास असेल, तो तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. सॅमसंगचा शक्तिशाली कॅमेरा आणि प्रोसेसर असलेला ‘Galaxy S25 5G’ सध्या ई-कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनवर अतिशय स्वस्त किमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

कंपनी या फ्लॅगशिप डिव्हाईसवर थेट २७% डिस्काउंट देत आहे. याशिवाय ग्राहकांसाठी विशेष बँक ऑफर्स आणि जुना फोन बदलण्यासाठी बंपर एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे, ज्यामुळे या फोनची किंमत कमालीची कमी झाली आहे.

Samsung Galaxy S25 5G Deal: अ‍ॅमेझॉनवरील ऑफर्सचे गणित; पाहा किती होईल बचत?

या प्रीमियम ५G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या सवलतींचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • थेट सवलत: या शानदार सॅमसंग फोनची मूळ बाजारपेठेतील किंमत 77,990 रुपये आहे. मात्र, सध्या अ‍ॅमेझॉनवरून तुम्ही हा फोन २७% डिस्काउंटनंतर थेट 56,830 रुपयांना खरेदी करू शकता.
  • बँक ऑफर्स: फोन खरेदी करताना एसबीआय (SBI) किंवा अ‍ॅक्सिस (Axis) बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ईएमआय पर्याय निवडल्यास ग्राहकांना 1,000 रुपयांची अतिरिक्त झटपट सूट मिळेल.
  • बंपर एक्सचेंज ऑफर: जर ग्राहकांकडे जुना स्मार्टफोन असेल तर तो बदलून अ‍ॅमेझॉनवर तब्बल 27,200 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्य मिळू शकते. अर्थात, ही किंमत जुन्या फोनच्या ब्रँड आणि स्थितीवर अवलंबून असेल.

स्नॅपड्रॅगनचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर; पाहा भन्नाट फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये युजर्सना उत्तम परफॉर्मन्स मिळावा म्हणून कंपनीने सर्वोत्तम तंत्रज्ञान दिले आहे:

  • प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: या 5G फोनमध्ये सर्वाधिक वेगवान ‘Snapdragon 8 Elite’ प्रोसेसर बसवण्यात आला आहे, ज्यामुळे गेमिंग आणि इतर कामे अतिशय सुलभतेने होतात.
  • डिस्प्ले क्वालिटी: फोनला 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट असलेला 6.2 इंचाचा डायनॅमिक अ‍ॅमोलेड २X स्क्रीन देण्यात आला आहे, जो उत्तम व्हिज्युअल अनुभव देतो.
  • पॉवरफुल कॅमेरा: फोटोग्राफीसाठी याच्या पाठीमागे एआय (AI) क्षमतेचा 50MP मुख्य कॅमेरा असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये प्रगत ऑन-डिव्हाईस जनरेटिव्ह एडिटिंगची सोय आहे.
  • बॅटरी आणि सॉफ्टवेअर: मोबाईलमध्ये प्रगत जेमिनी लाईव्ह इंटिग्रेशनसह 4,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. तसेच कंपनीकडून या फोनला प्रदीर्घ काळासाठी सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जाणार आहेत.
Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या