Home / देश-विदेश / Kumbhmela Girl Monalisa : ‘कुंभमेळा गर्ल’ मोनालिसाला पोलीस संरक्षण; केरळ उच्च न्यायालयाचे आदेश

Kumbhmela Girl Monalisa : ‘कुंभमेळा गर्ल’ मोनालिसाला पोलीस संरक्षण; केरळ उच्च न्यायालयाचे आदेश

Kumbhmela Girl Monalisa : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात ‘कुंभमेळा गर्ल’ (Kumbhmela Girl Monalisa)म्हणून ओळख मिळालेल्या...

By: Team Navakal
Kumbhmela Girl Monalisa
Social + WhatsApp CTA

Kumbhmela Girl Monalisa : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात ‘कुंभमेळा गर्ल’ (Kumbhmela Girl Monalisa)म्हणून ओळख मिळालेल्या मोनालिसा भोसले हिला केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) पोलीस

संरक्षण (police protection)देण्याचे आदेश दिले आहेत. जीवाला धोका असल्याचा दावा करत मोनालिसाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने एर्नाकुलम सेंट्रल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तिला पुरेशी सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार असून, तोपर्यंत मोनालिसाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस प्रशासनावर असेल.

धमक्यांमुळे न्यायालयात धाव

मोनालिसाने दाखल केलेल्या याचिकेत आंतरधर्मीय विवाह (Interfaith Marriage), तिच्या वयासंदर्भातील वाद आणि सोशल मीडियावरून होत असलेल्या ट्रोलिंगमुळे स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा केला होता. तसेच अज्ञात व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचेही तिने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.याचिकाकर्त्याच्या वकिलांचा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रथमदर्शनी मोनालिसाची सुरक्षा मागणी योग्य असल्याचे नमूद केले. त्यानंतर तिला आवश्यक ते संरक्षण देण्याचे आदेश देण्यात आले.

पतीला ट्रान्झिट जामीन

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने मोनालिसाचा पती मोहम्मद फर्मान (Husband Mohammad Farman) याला एक महिन्याचा ट्रान्झिट जामीन (Transit Bail) मंजूर केला होता. मोनालिसा अल्पवयीन असल्याचा दावा करत तिचे वडील जयसिंह भोसले यांनी मध्य प्रदेश पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फर्मानविरोधात अपहरणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाकुंभातून मिळाली देशव्यापी प्रसिद्धी

मोनालिसा भोसले हे नाव २०२५ मधील प्रयागराज महाकुंभमेळ्यादरम्यान अचानक चर्चेत आले. कुंभमेळ्याच्या परिसरात रुद्राक्ष आणि फुलांच्या माळा विकणाऱ्या मोनालिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला होता.

तिचे अंबर रंगाचे डोळे, सहज स्मितहास्य आणि नैसर्गिक सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना जागतिक प्रसिद्ध ‘मोनालिसा’ चित्राशी केली. त्यानंतर तिला ‘कुंभमेळा गर्ल’ हे टोपणनाव मिळाले आणि ती काही दिवसांतच इंटरनेट सेन्सेशन बनली.या प्रसिद्धीनंतर तिला अभिनय क्षेत्रातूनही ऑफर्स मिळू लागल्या आणि तिच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.

केरळमधील मंदिरात पार पडला विवाह

monalisa husband
monalisa husband

मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी असलेल्या मोनालिसाने नुकतेच तिचा प्रियकर फर्मान खान याच्याशी विवाह केला. हा विवाह आंतरधर्मीय असल्याने तो विशेष चर्चेचा विषय ठरला.

केरळमधील पूवार येथील अरुमनूर श्री नैनार देवा मंदिरात हा विवाह साध्या पद्धतीने पण धार्मिक विधींनुसार पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते.मात्र या विवाहाला मोनालिसाच्या कुटुंबीयांचा, विशेषतः तिच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. कुटुंबीयांकडून दबाव टाकला जात असल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले होते.

फेसबुकवरून सुरू झालेली प्रेमकहाणी

मोनालिसा आणि फर्मान खान यांची ओळख सुमारे सहा महिन्यांपूर्वी फेसबुक (Facebook) या सामाजिक माध्यमावर झाली होती. सुरुवातीला मैत्री असलेले हे नाते पुढे प्रेमात बदलले. कालांतराने दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.धर्म वेगळे असल्याने या नात्याला कुटुंबीयांचा विरोध झाला. समाजातील प्रतिक्रिया आणि कौटुंबिक दबाव यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले.

फर्मान खान कोण आहे?

Kumbhmela Girl Monalisa
Kumbhmela Girl Monalisa

मोनालिसाचा पती फर्मान खान हा व्यावसायिक मॉडेल (Model) असून अभिनय क्षेत्रातही तो आपले करिअर घडवत आहे. सोशल मीडियावर त्याची चांगली ओळख असून विविध जाहिराती आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांमध्ये तो काम करत असल्याची माहिती आहे.मोनालिसा आणि फर्मान या दोघांचीही आवड अभिनय क्षेत्राशी निगडित असल्याने ही जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

‘नागम्मा’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडला वाद

मोनालिसा सध्या तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपट ‘नागम्मा’च्या (Nagamma) चित्रीकरणात व्यस्त आहे. केरळमधील पूवार येथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना तिचे वडील तिला शोधत तेथे पोहोचल्याची माहिती समोर आली.तिला इंदूरला परत नेण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मोनालिसा आणि फर्मान यांनी थेट पोलिस ठाणे गाठून संरक्षणाची मागणी केली.

पोलिस संरक्षणानंतर पुढील सुनावणीकडे लक्ष

कौटुंबिक वाद, आंतरधर्मीय विवाह, सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि कायदेशीर संघर्ष अशा अनेक कारणांमुळे मोनालिसा भोसले प्रकरण राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले आहे. आता केरळ उच्च न्यायालयाने सुरक्षा देण्याचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून १० जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे देखील वाचा –

Samsung चा महागडा 5G फ्लॅगशिप फोन अ‍ॅमेझॉनवर झाला खूप स्वस्त! थेट 27% डिस्काउंट; पाहा बँक ऑफर्स

 30 जूनपूर्वी कोणाला येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस? जाणून घ्या कारणे आणि ऑनलाईन उत्तर देण्याची सोपी पद्धत

Prada Chai Perfume: प्राडा कंपनीने आणले खास ‘चहाच्या सुवासाचे’ परफ्युम! किंमत ऐकून उडेल झोप

Web Title:
संबंधित बातम्या