Home / लेख / Most Expensive Electric Scooters: देशातील ‘या’ 4 इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत लाखांच्या घरात; फीचर्स पाहून थक्क व्हाल

Most Expensive Electric Scooters: देशातील ‘या’ 4 इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत लाखांच्या घरात; फीचर्स पाहून थक्क व्हाल

Most Expensive Electric Scooters: भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आता इलेक्ट्रिक स्कूटर्सचा लूक आणि परफॉर्मन्स पूर्णपणे बदलला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आघाडीच्या...

By: Team Navakal
Most Expensive Electric Scooters: देशातील 'या' 4 इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत लाखांच्या घरात; फीचर्स पाहून थक्क व्हाल
Social + WhatsApp CTA

Most Expensive Electric Scooters: भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आता इलेक्ट्रिक स्कूटर्सचा लूक आणि परफॉर्मन्स पूर्णपणे बदलला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांनी केवळ जास्त रेंज देणाऱ्याच नाही, तर अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पोर्टी डिझाईन असलेल्या प्रीमियम स्कूटर्स बाजारात आणल्या आहेत. या गाड्यांचे फीचर्स एखाद्या आलिशान कारला टक्कर देतील असे आहेत, ज्यामुळे त्यांची किंमतही लाखांच्या घरात पोहोचली आहे.

जर तुम्हाला सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव आणि रस्त्यावर कडक टशन हवी असेल, तर सध्या भारतात उपलब्ध असलेल्या ४ सर्वात महागड्या आणि प्रगत इलेक्ट्रिक स्कूटर्सचा सविस्तर रिव्ह्यू खालीलप्रमाणे आहे.

दमदार बॅटरी आणि आधुनिक तंत्रज्ञान; पाहा गाड्यांचा नवीन क्रम:

  • TVS X: टीव्हीएस कंपनीची ही एक अतिशय प्रगत आणि स्पोर्टी लूक असलेली प्रीमियम स्कूटर आहे. यात 4.4kWh क्षमतेची तगडी बॅटरी आणि 11kW ची हाय-परफॉर्मन्स मोटर देण्यात आली आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर साधारण 140 किमीपर्यंत धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. यात फीचर्स म्हणून 10.2 इंचाचा वळवता येणारा (टिल्ट) टीएफटी डिस्प्ले, नेव्हिगेशन सिस्टीम आणि कनेक्टेड फीचर्स मिळतात. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2,66,141 रुपये आहे.
  • BMW CE02: जर्मनीच्या बीएमडब्ल्यू कंपनीने खास तरुण वर्ग आणि शहरातील दैनंदिन प्रवास लक्षात घेऊन हे मॉडेल तयार केले आहे. ही स्कूटर 15bhp ची पॉवर जनरेट करते. यात रायडिंगसाठी फ्लो, सर्फ आणि फ्लॅशसारखे अप्रतिम मोड्स मिळतात. याशिवाय कीलेस-राइड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि रिव्हर्स असिस्ट यांसारखे हायटेक फीचर्स यात समाविष्ट आहेत. भारतात याची एक्स-शोरूम किंमत 4,49,000 रुपये आहे.
  • Suzuki e-Access: सुझुकी कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय अ‍ॅक्सेस मॉडेलला आता इलेक्ट्रिक अवतारात आणले आहे. रोजच्या कौटुंबिक वापरासाठी ही स्कूटर अतिशय आरामदायी आहे. आरामदायी प्रवासासोबतच यामध्ये सुरक्षिततेसाठी पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,88,490 रुपये आहे.
  • BMW CE04: ही सध्याच्या घडीला भारतातील सर्वात महागडी आणि अद्भूत डिझाईन असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात बॅटरी खालच्या भागात बसवली असल्याने गाडी चालवताना रस्त्यावर कमालीचा समतोल मिळतो. यात लिक्विड-कूल्ड इलेक्ट्रिक मोटर दिली असून ती 420bhp ची ताकद आणि 62nm चा टॉर्क जनरेट करते. सिंगल चार्जमध्ये ही गाडी 130 किमीची रेंज देते. याची एक्स-शोरूम किंमत तब्बल 15.25 lakh रुपये आहे.
Web Title:
Topics:
संबंधित बातम्या