Home / लेख / Ducati Scrambler Nightshift नव्या अवतारात भारतात लाँच! दमदार इंजिन आणि रॉयल लूक; पाहा किंमत

Ducati Scrambler Nightshift नव्या अवतारात भारतात लाँच! दमदार इंजिन आणि रॉयल लूक; पाहा किंमत

Ducati Scrambler Nightshift : भारतातील प्रीमियम आणि स्पोर्ट्स बाईक उत्पादक कंपनी दुकाती इंडियाने आपली नवीन 2026 Ducati Scrambler Nightshift भारतीय...

By: Team Navakal
Ducati Scrambler Nightshift नव्या अवतारात भारतात लाँच! दमदार इंजिन आणि रॉयल लूक; पाहा किंमत
Social + WhatsApp CTA

Ducati Scrambler Nightshift : भारतातील प्रीमियम आणि स्पोर्ट्स बाईक उत्पादक कंपनी दुकाती इंडियाने आपली नवीन 2026 Ducati Scrambler Nightshift भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केली आहे. या शक्तिशाली बाईकची भारतातील एक्स-शोरूम किंमत 13.74 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या नवीन मॉडेलमध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या रंगात केला आहे.

ही बाईक आता एका अत्यंत आकर्षक अशा ‘एमरॉल्ड ग्रीन’ (हिरव्या) रंगात सादर करण्यात आली आहे. हा नवीन रंग बाजारात आधी मिळणाऱ्या जुन्या रंगाची जागा घेईल. बाईकच्या लुकला अधिक प्रीमियम बनवण्यासाठी हा नवीन पेंट ऑप्शन देण्यात आला असून या मॉडेलमधील हा मुख्य अपडेट आहे.

क्लासिक कॅफे रेसर डिझाईन आणि स्टाईलची कमाल

Ducati Scrambler Nightshift ही तिच्या संपूर्ण सिरीजमध्ये जुन्या काळातील ‘कॅफे रेसर’ बाईक्सच्या डिझाईनने प्रेरित असलेले सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. ही बाईक विंटेज लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट मेळ घालते.

  • ऐतिहासिक रंगाची प्रेरणा: कंपनीच्या मते, यामध्ये वापरलेला एमरॉल्ड ग्रीन रंग हा 1970 च्या दशकातील प्रसिद्ध टू-व्हीलर आणि फोर-व्हीलर रेसिंग गाड्यांवरून प्रेरित आहे.
  • आकर्षक लूक: बाईकच्या हँडलबारच्या कडांना आरसे (बार-एंड मिरर्स) देण्यात आले असून हँडलबार पूर्णपणे फ्लॅट आहे.
  • स्पोर्टी वैशिष्ट्ये: यामध्ये डिझायनर शिलाई असलेली आरामदायी सीट, ब्लॅक रंगाचे वायर-स्पोक व्हील्स आणि ग्लॉस व मॅट फिनिशिंगचे सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळते. यासोबतच छोटे आकर्षक एलईडी इंडिकेटर्स आणि मडगार्ड्स देण्यात आले आहेत.

वजन झाले कमी; रायडर्ससाठी आरामदायक बदल

दुकातीने या नवीन बाईकच्या क्लच सिस्टीममध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नव्याने डिझाईन केलेला हा क्लच वापरण्यास अत्यंत स्मूथ आणि आकाराने लहान आहे. यामुळे बाईकची एकूण रुंदी कमी झाली असून रायडरला आपले पाय ठेवण्यासाठी अतिरिक्त जागा मिलती. तसेच, हा नवीन अपडेटेड मॉडेल जुन्या मॉडेलच्या तुलनेत तब्बल 4 किलोग्रॅमने हलका झाला आहे, ज्यामुळे बाईक हँडल करणे अधिक सोपे होईल.

शक्तीशाली इंजिन आणि भन्नाट परफॉर्मन्स

या दमदार दुचाकीच्या इंजिन आणि मेकॅनिकल्सची रचना खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:

सस्पेन्शन आणि टायर्स: ही बाईक मजबूत स्टील फ्रेमवर तयार करण्यात आली आहे. याच्या पुढच्या भागात 41 मिमीचे अपसाइड-डाउन आणि पाठीमागे मोनोशॉक सस्पेन्शन मिळते. उत्तम रोड ग्रिपसाठी यात 18 इंचाचे फ्रंट आणि 17 इंचाचे रियर वायर-स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत.

इंजिन क्षमता: बाईकमध्ये आधीसारखेच 803 सीसी क्षमतेचे एअर-कूल्ड, एल-ट्विन डेस्मोड्यू इंजिन देण्यात आले आहे.

पॉवर आणि टॉर्क: हे इंजिन 72 बीएचपीची कमाल पॉवर आणि 65.2 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे.

हे देखील वाचा – Maharashtra Politics: ‘ऑफर आली तर नक्कीच…’; अमोल कोल्हेंच्या विधानाने ऑपरेशन तुतारीची चर्चा

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या