Home / लेख / Telegram Signal Government Notice: व्हॉट्सअ‍ॅपनंतर आता टेलिग्राम आणि सिग्नल सरकारच्या रडारवर! ‘युझरनेम’वरून आयटी मंत्रालयाची नोटीस

Telegram Signal Government Notice: व्हॉट्सअ‍ॅपनंतर आता टेलिग्राम आणि सिग्नल सरकारच्या रडारवर! ‘युझरनेम’वरून आयटी मंत्रालयाची नोटीस

Telegram Signal Government Notice: ऑनलाईन सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे....

By: Team Navakal
Telegram Signal Government Notice: व्हॉट्सअ‍ॅपनंतर आता टेलिग्राम आणि सिग्नल सरकारच्या रडारवर! 'युझरनेम'वरून आयटी मंत्रालयाची नोटीस
Social + WhatsApp CTA

Telegram Signal Government Notice: ऑनलाईन सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘युझरनेम’ फीचरला स्थगिती दिल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) आता आपला मोर्चा टेलिग्राम (Telegram) आणि सिग्नल (Signal) या इतर दोन मोठ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सकडे वळवला आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने या दोन्ही कंपन्यांना कडक नोटीस बजावली असून, युझरनेममुळे वाढणाऱ्या सायबर फसवणुकीवर ते काय उपाययोजना करत आहेत, याचे स्पष्टीकरण मागवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, टेलिग्रामवर हे फीचर आधीपासूनच सुरू असल्याने, ही सुविधा चालू ठेवण्यास त्यांना का परवानगी द्यावी, असा थेट जाबच सरकारने विचारला आहे.

सरकारला नक्की कशाची भीती? सायबर गुन्ह्यांचा वाढता आलेख

या मेसेजिंग अ‍ॅप्सवर मोबाईल नंबर लपवून केवळ युझरनेमद्वारे संवाद साधण्याची सुविधा दिली जाते. सरकारच्या मते, या सुविधेमुळे खालील गंभीर धोके निर्माण होऊ शकतात:

  • डिजिटल अरेस्ट आणि फ्रॉड: युझरनेमच्या आडून खरी ओळख लपवणे सायबर गुन्हेगारांना सोपे जाते. यामुळे फिशिंग, ऑनलाईन फसवणूक आणि सध्या देशात धुमाकूळ घालणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या घटनांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
  • बनावट खात्यांचा सुळसुळाट: गुन्हेगार एखाद्या सेलिब्रिटी, मोठे नेते, सरकारी अधिकारी किंवा नामांकित संस्थांच्या नावाने हुबेहूब मिळतीजुळती युझरनेम्स तयार करून लोकांची फसवणूक करू शकतात.

यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपला पाठवलेल्या नोटीसमध्ये सरकारने स्पष्ट केले होते की, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) नियमांचे उल्लंघन झाल्यास कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

काय आहे ‘युझरनेम’चा वाद आणि व्हॉट्सअ‍ॅपचा बचाव?

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच आपल्या युझर्सना युझरनेम राखून ठेवण्याची सुविधा दिली होती, जी आता सरकारने रोखली आहे. या वादावर व्हॉट्सअ‍ॅपने आपले स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत:

  • फोर-डिजिट कोड सिक्युरिटी: व्हॉट्सअ‍ॅपने 4 अंकी अनोखा कोड देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. म्हणजेच, ज्याच्याकडे युझरनेम आणि हा 4 अंकी कोड दोन्ही असेल, तीच व्यक्ती तुम्हाला मेसेज करू शकेल.
  • अनोळखी मेसेजवर अलर्ट: जर कोणी अनोळखी व्यक्ती युझरनेमवरून मेसेज करेल, तर ती कोणत्या देशातील आहे, हे युझरला स्क्रीनवर दिसेल. तसेच अशा युझरनेम्सचा शोध घेण्यासाठी कोणतीही सार्वजनिक डिरेक्टरी उपलब्ध नसेल.

भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे तब्बल 500 दशलक्ष पेक्षा जास्त युझर्स आहेत, ज्यामुळे टेलिग्रामच्या तुलनेत व्हॉट्सअ‍ॅपवरील या फिचरचा प्रभाव खूप मोठा असू शकतो.

तज्ज्ञांमध्ये दोन तट; टेलिग्राम आधीच संशयाच्या भोवऱ्यात

या संपूर्ण प्रकरणावर सायबर सुरक्षा तज्ज्ञांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, नंबर लपवल्यामुळे मोबाईल नंबर चोरून बँक खाती हॅक करण्याचे (सिम-स्वॅप फ्रॉड) गुन्हे कमी होऊ शकतात. दुसरीकडे, इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन (IFF) या संस्थेने सरकारच्या या थेट हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, फिचर लाँच होण्यापूर्वीच त्यावर बंदी घालणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, टेलिग्राम कंपनी आधीच भारतीय प्रशासनाच्या रडारवर आहे. काही काळापूर्वी नीट (NEET) परीक्षेचे पेपर लीक होणे आणि बनावट माहिती पसरवल्याच्या आरोपावरून सरकारने 22 June पर्यंत टेलिग्राम आणि त्याच्याशी संबंधित काही सेवांवर तात्पुरती बंदी घातली होती. त्यानंतर आता पुन्हा युझरनेमच्या मुद्द्यावरून टेलिग्रामच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या