Home / देश-विदेश / Ram Mandir Donation Scam: राम मंदिरातील 5 कोटींची सोन्याचे रामचरितमानस गायब? माजी आयएएस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

Ram Mandir Donation Scam: राम मंदिरातील 5 कोटींची सोन्याचे रामचरितमानस गायब? माजी आयएएस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

Ram Mandir Donation Scam: अयोध्येतील भव्य राम मंदिरातील देणगी आणि दागिन्यांच्या कथित अपहाराचे प्रकरण आता अधिकच गडद होताना दिसत आहे....

By: Team Navakal
Ram Mandir Donation Scam: राम मंदिरातील 5 कोटींची सोन्याचे रामचरितमानस गायब? माजी आयएएस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप
Social + WhatsApp CTA

Ram Mandir Donation Scam: अयोध्येतील भव्य राम मंदिरातील देणगी आणि दागिन्यांच्या कथित अपहाराचे प्रकरण आता अधिकच गडद होताना दिसत आहे. मंदिरातील राममंदिर दान चोरी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, आता एका माजी आयएएस अधिकाऱ्याने लावलेल्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. माजी आयएएस अधिकारी एस. लक्ष्मीनारायणन यांनी दावा केला आहे की, त्यांच्या कुटुंबाने मंदिराला भेट दिलेली सोन्याचा परत असलेली ‘रामचरितमानस’ची प्रत मंदिर परिसरातून हटवण्यात आली आहे. या प्रतची बाजारपेठेतील किंमत सुमारे 5 कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

लक्ष्मीनारायणन यांनी एप्रिल 2024 मध्ये ही मौल्यवान प्रत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे सुपूर्द केली होती. या संदर्भात जेव्हा त्यांनी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा मंदिराला मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचे प्रदर्शन गाभाऱ्यात किंवा मंदिरात करणे शक्य नसते, असे उत्तर त्यांना देण्यात आले.

चांदीच्या विटा गायब झाल्याचा जुना वाद; उद्धव ठाकरेंच्या विटेचाही उल्लेख

यापूर्वी राम मंदिराच्या बांधकामादरम्यान दान करण्यात आलेल्या चांदीच्या विटा आणि लाद्या बेपत्ता झाल्याचा आरोप विरोधक आणि इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने केला होता:

  • उद्धव ठाकरेंची वीट: गायब झालेल्या वस्तूंमध्ये शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंदिर उभारणीच्या वेळी पाठवलेल्या 4 किलो वजनाच्या चांदीच्या विटेचाही समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
  • SIT चा दावा: या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) सुमारे 200 किलो चांदीच्या विटा चोरीला गेल्याच्या वावड्या फेटाळून लावल्या आहेत.

ओळख मिटवण्यासाठी सोन्याचे दागिने वितळवले? एसआयटीला संशय

राम मंदिरातील दागिन्यांच्या चोरीचा तपास करणाऱ्या एसआयटीला आता एक नवीन आणि धक्कादायक संशय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी मंदिरातून चोरलेले सोन्याचे दागिने ओळख पटू नये म्हणून वितळवले असण्याची शक्यता आहे.

दागिने वितळवून त्याचे सोन्याच्या बिस्किटांमध्ये रूपांतर करण्यात आले असावे, असा पोलिसांना संशय आहे. चोरीला गेलेले मूळ दागिने शोधण्यासाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवूनही काहीही हाती न लागल्यामुळे हा संशय बळावला आहे.

“दान मोजणीत माझी भूमिका नाही”; ट्रस्टच्या कोषाध्यक्षांचे स्पष्टीकरण

या संपूर्ण वादावर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दोन पानांचे सविस्तर पत्रक जारी करत आपले मौन सोडले आहे:

  • तपासाची मागणी: कथित चोरीच्या या घटनेने प्रभू रामाच्या कोट्यवधी भक्तांच्या भावना दुखावल्या असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
  • प्रक्रियेपासून लांब: देणगी आणि दान म्हणून आलेली रोकड किंवा दागिने मोजण्याच्या प्रक्रियेत माझी वैयक्तिक कोणतीही भूमिका नसते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ही चोरी बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचे अहवालातून दिसत असून ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीन नियमावली लागू; कर्मचाऱ्यांसाठी खिसे नसलेला गणवेश

चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर राम मंदिर ट्रस्टने देणगी मोजण्याच्या पद्धतीत मोठे आणि कडक बदल केले आहेत:

  1. दोन स्तरांची सुरक्षा: दान मोजणी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याची 2 स्तरांवर कडक सुरक्षा तपासणी केली जाईल.
  2. विशेष ड्रेस कोड: मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गडद निळ्या रंगाचा नवीन गणवेश बंधनकारक करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कपड्यांना एकही खिसा (पॉकेट) नसेल, जेणेकरून कोणतीही रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू लपवून ठेवता येणार नाही.

पंतप्रधान आणि गृहमंत्री गप्प का? काँग्रेसचा हल्लाबोल

राम मंदिरातील हा अपहार 7 जून रोजी समोर आला होता, ज्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे 25 जून रोजी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत मोजणी प्रक्रियेशी संबंधित असलेल्या 8 लोकांना अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेसने भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या नावावर मोठा घोटाळा झाला असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मौन का बाळगले आहे, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या