Supriya Sule : भाजपाला पाठिंबा किंवा विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा आज सुप्रिया सुळे यांनी खोडून काढल्या. सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, पक्ष कुणाशी बोललेला नाही. ज्या बातम्या आहेत त्या सूत्रांमार्फत दिल्या आहेत. पक्षाने अधिकृत कोणतीही भूमिका मांडलेली नाही. मी सतेज पाटील (काँग्रेस) व संजय राऊत (उबाठा) यांच्याशी बोलले आहे.
महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झाले आहे. मला, ओवेसी व अरविंद सावंत यांना किरण रिजूजू व अमित शहा यांनी बोलावले. ते म्हणाले की, ते द्रमुक, काँग्रेसशी बोललो आहे. लोकसंख्यानुसार मतदारसंघ पुनर्रचना केली तर दक्षिणेवर अन्याय होतो. त्यामुळे नवीन प्रस्ताव असा आहे की, सरसकट 50 टक्के वाढ करूया. मग आम्ही विनंती केली की, सर्वांशी एकत्र चर्चा केली. आता आम्हाला सरकारचा हा प्रस्ताव मान्य होता. पण प्रत्यक्षात विधेयक आले तेव्हा 50 टक्क्यांचा उल्लेखच त्यात नव्हता. त्यामुळे आम्ही विरोध केला. आता नवा प्रस्ताव येईल त्यात 50 टक्के वाढ आणि पुनर्रचनेची प्रक्रिया यावर विचार करून मान्यता देऊ. मात्र प्रस्ताव अद्याप आलेला नाही.
जर एखाद्याला 30 दिवस कैद झाली तर त्याला राजकीय पदावरून आपोआप काढले जाईल, या विधेयकाला मात्र आमचा विरोध आहे.
आम्ही काँग्रेसबरोबर जाणार, राष्ट्रवादीत जाणार, शिवसेनेत जाणार ही चर्चा सुरू आहे. आम्ही कधीच याबद्दल बोललो नाही, आमच्यावर ईडी, सीबीआय येत नाही. म्हणून मग आमची बदनामी केली जात आहे. शरद पवार हे एकनाथ शिंदेंच्या केबिनमध्ये गेले हा योगायोग आहे. परत येताना ते आमदारांशी बोलायला रिकाम्या खोलीत बसले. राऊतांना हे सांगितले, त्यांनी मान्य केले. काल जयंत पाटील हे फडणवीसांचा वेळ मागून गेले होते. ईश्वरपूर नगराध्यक्षांवर कारवाईचा विषय होता.
अयोध्या व उज्जैन मंदिरातील दान चोरीबाबत केंद्र सरकार कोणती कारवाई करणार आहे? पंतप्रधानांच्या मतदारसंघात केंद्र सरकार जो ट्रस्ट चालवतो, त्या मंदिर ट्रस्टमध्ये लूट व्हावी हे वेदनादायक आहे. यावर आम्हाला माहिती हवी आहे.
…………………………………..
17 जुलैला सुप्रिया सुळे या दिल्लीत जंतरमंतरवर जाऊन अभिजित दीपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
…………………………………..
लाडकी बहीण योजनेची चौकशी एसआयटीने करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.









