नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत निघाली 1000 पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

Bank Jobs: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असणाऱ्या तरूणांसाठी चांगली संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India) क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. जवळपास 1 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

पात्रता

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये सामान्य श्रेणीसाठी 60% आणि SC/ST/OBC/PWBD साठी 55% गुण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्ष असावे आणि कमाल 30 वर्ष असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट मिळेल.

अर्जाची तारीख

इच्छुक व पात्र उमेदवार centralbankofindia.co.in वरून अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 30 जानेवारीपासून सुरू झाली असून, 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. सामान्य, ओबीसी, आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 750 रुपये आणि एसटी, एससी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी 150 रुपये अर्ज शुल्क लागू असेल.

निवड प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर भरतीसाठी उमेदवारांना दोन टप्पे पार करावे लागतील. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन परीक्षा होईल. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर दोन्ही टप्प्यातील गुण एकत्र करून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.

पगार

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहिन्याला 48,480 रुपये पासून ते 85,920 रुपये पर्यंत वेतन मिळेल.

Share:

More Posts