Home / शहर / तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी गजर्ला रवीचा खात्मा

तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी गजर्ला रवीचा खात्मा

गडचिरोली – नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि तीन कोटींचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी गजर्ला रवीला (Gajarla Ravi)आज आंध्रप्रदेश (Andhra Pradesh)...

By: Team Navakal
gadchiroli nakshalwadi Gajarla Ravi

गडचिरोली – नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि तीन कोटींचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी गजर्ला रवीला (Gajarla Ravi)आज आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) पोलिसांनी चकमकीत ठार मारले. या चकमकीत त्याच्यासह नक्षल नेता चलपतीची पत्नी आणि झोनल समिती सदस्य रावी व्यंकट चैतन्य उर्फ अरुणा आणि अंजू या दोघीही ठार झाल्या.
आंध्रप्रदेश पोलिसांनी माहिती दिली की, अल्लुरी सीतारामराजू (Alluri Sitharama Raju)जिल्ह्यातील मारडपल्लीच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यावरून आज विशेष नक्षलविरोधी पथक ग्रेहाउंड्सच्या जवानांनी या परिसरात शोधमोहीम राबवली. सकाळी सहा वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात नक्षलवादी केंद्रीय समितीतील तीन सदस्य ठार झाले.मूळ तेलंगणाचा रहिवासी असलेल्या रवीवर आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि झारखंड या सहा राज्यांचे तीन कोटी रुपयांचे बक्षीस होते. त्याचा तीन राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये प्रभाव होता. त्याच्यासोबत अरुणाही ठार झाली. तिच्यावरही ५० लाख रुपयांचे बक्षीस होते.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या