Home / शहर / Chhatrapati Shivaji Maharaj station named Kotak: छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला ‌‘कोटक‌’ नाव ! कंपन्यांना नव्या मेट्रोची नावे विकल्याने संताप

Chhatrapati Shivaji Maharaj station named Kotak: छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला ‌‘कोटक‌’ नाव ! कंपन्यांना नव्या मेट्रोची नावे विकल्याने संताप

Chhatrapati Shivaji Maharaj station named Kotak- छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमंत योगी, जाणता राजा असा गौरव होतो. ‌‘कोटक‌’ छत्रपती शिवाजी महाराज...

By: Team Navakal
Chhatrapati Shivaji Maharaj station named 'Kotak

Chhatrapati Shivaji Maharaj station named Kotak- छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमंत योगी, जाणता राजा असा गौरव होतो. ‌‘कोटक‌’ छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj station named Kotak)असा त्यांच्या नावाचा उल्लेख आजवर झाला नव्हता. लंबोदर सिध्दिविनायक आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. आता लोंबार्ड सिद्धिविनायक या नावाचे बोर्ड झळकत आहेत. मुंबई मेट्रो स्टेशनची नावे खाजगी कंपन्यांनी पाच वर्षांसाठी कोट्यवधी रूपये देऊन विकत घेतली आहेत. मात्र हे करताना आपल्या आदरस्थानांच्या नावांचा आपण अपमान करीत आहोत हेही लक्षात घेतले गेले नाही अशी तक्रार आज काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.


सचिन सावंत म्हणाले की, महालक्ष्मी देवीच्या समोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतो त्या महालक्ष्मी स्थानकाचे नाव एचडीएफसी लाईफ महालक्ष्मी स्टेशन असे करणे योग्य आहे का? मुंबई मेट्रो 3 स्थानकांची नावे निश्चित करताना मराठी माणसांसाठी व हिंदूंसाठी आराध्य असलेल्या दैवतांच्या नावांच्या आधी भांडवलदार कंपन्यांची नावे जोडण्यात आली आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज एक पत्रकार परिषद घेत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. सावंत यांनी एक चित्रफित दाखवली आणि त्यात मेट्रो 3 वरील स्थानकांच्या नावांची उद्घोषणा सर्वांना ऐकवली. ते म्हणाले की नामकरण वा नामांतरे हे भाजपाने नेहमीच हिंदुत्वाचे एक शस्त्र म्हणून वापरले. अलाहाबादचे प्रयागराज केले. देशभरात अशी नामांतरे करण्यात आली. भाजपाचे हिंदुत्व पूर्वी दांभिक होते.

आता ते कार्पोरेट हिंदुत्व झाले आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी, भांडवलदारांच्या हितासाठी हिंदुत्वाचा गैरवापर भाजपा व त्यांच्या नेतृत्वातील सरकार करीत आहे. मराठी माणसाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे कंपनीचे नाव जोडण्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. मात्र राज्य सरकारने चक्क कोटक कंपनीचे नाव तिथे जोडले आहे. ज्यांना खालिद का शिवाजी हे चित्रपटाचे नाव मंजूर नव्हते त्यांना कोटक छत्रपती शिवाजी महाराज हा उल्लेख कसा चालतो? सिद्धिविनायकावर तर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाची भक्ती आहे. हिंदू देवदेवतांचा सन्मान केवळ आम्हीच जपतो असे दावे करणाऱ्या भाजपने सिद्धिविनायकाच्या नावामागे आयसीआय लोंबार्डचे नाव जोडले आहे. देवी महालक्ष्मी ही लाखोंसाठी जीवदायिनी आहे. या देवीच्या नावामागे एचडीएफसी लाईफ कंपनीचे नाव जोडून भाजपाने या देवीलाच जीवनासाठी एचडीएफसी लाईफची गरज असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे का? अशा शब्दात त्यांनी मुंबई मेट्रो आणि भाजपावर टीका केली.

एका स्टेशनवर 5 वर्षे नाव येण्यासाठी 7 ते 8 कोटींची बोली लागल्याचे सांगितले जाते .
थोर लेखक व नाटककार आचार्य अत्रे यांच्या नावामागे निप्पॉन इंडिया एमएफ या कंपनीचे नाव जोडण्यात आले आहे. आज जर अत्रे जिवंत असते तर त्यांनी नावांचे काय महत्त्व असते हे आजच्या सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले असते. भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी यावर खुलासा करावा, अशी मागणीही
त्यांनी केली.


शीतलादेवी, काळबादेवी नावांची विक्री
आता भाजपाचे महायुती सरकार शीतलादेवी व काळबादेवी या नावांची लिलावाव्दारे विक्री करायला निघाले आहे. या दोन्ही स्थानकांवर आपली नावे जोडण्यासाठी खासगी कंपन्या बोली लावत आहेत.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा – 

सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी ‘एनओसीची’ गरज नाही

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात हायकोर्टात याचिका

 नाशिक एलसीए उत्पादन लाइनचे उद्घाटन, दरवर्षी आठ स्वदेशी तेजस विमाने तयार करू शकतात..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या