Mumbai Police : आता डी- मार्ट( D-Mart) च्या धर्तीवर मुंबई पोलिसांची(Mumbai Police) कॅन्टीन (canteen) सुरू झाली आहे. दादर नायगाव येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात ही कॅन्टीन असून नूतनीकरण झालेल्या या कॅन्टीनचे उद्घाटन पोलीस आयुक्त देवेन भारती (CP Deven Bharti) यांनी केले.
नायगाव येथील या कॅण्टीनमध्ये अन्य साहित्यांबरोबर आता अन्न-धान्य आणि खाद्यपदार्थही स्वस्तात व मुबलक प्रमाणात मिळणार आहेत. पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ जवान व राजभवन कर्मचाऱ्यांसाठी येथे किराणा माल उपलब्ध करून दिला जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे कॅन्टीन सुरू आहे. येथे पोलिसांना आवश्यक साहित्य अनुदानातून दिले जाते. परंतु पोलीस आयुक्तांनी या कॅण्टीनला आणखी भव्य रूप देत डी-मार्टच्या धर्तीवर पोलिसांना अन्य साहित्यांबरोबरच अन्नधान्य, खाद्यपदार्थदेखील स्वस्तात व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार कॅण्टीनचे नूतनीकरण करण्यात आले असून नवा साज चढलेल्या कॅण्टीनचे आयुक्त भारती यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याच कॅण्टीनमधून शहरातील अन्य चार ‘ल’ विभागातील कॅन्टीनमध्येदेखील सर्व साहित्य,अन्नधान्य, खाद्यपदार्थ पोलिसांसाठी स्वस्तात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –