TATA Motors Name Change : भारतातील सर्वात विश्वासाहार्थ ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्स (Tata Motors) आता एका नवीन ढंगात आणि नवीन नावाच्या रूपात दिसू लागली आहे. कंपनीच्या बहुचर्चित डिमर्जर प्रक्रियेनंतर आता टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसायाचं नाव बदलण्यात आलं आहे. हे नाव बदलून टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPV) अस नाव करण्यात आल आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स असतील, तर तुमच्या डिमॅट खात्यात आता कंपनीचे नाव टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPV) असं दिसेल.
टाटा मोटर्सने मागच्या वर्षीच आपली व्यावसायिक (Commercial) वाहने आणि प्रवासी वाहने (Passenger Vehicle) या व्यवसायांना वेगळं करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा अर्थ असा कि यामुळे दोन्ही विभागांवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करता येईल. आता कंपनीनं ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. व्यावसायिक युनिटचं नाव TML Commercial Vehicles Ltd (TMLCV) असेल, तर प्रवासी वाहन युनिटला TMPV हे नवीन नाव देण्यात आलं आहे.
डिमर्जरनंतर TMPV चे शेअर्स शुक्रवार सकाळी किरकोळ घसरणीसह ४०६.२५ रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत होते तसेच हा शेअर १४ ऑक्टोबर रोजी स्पेशल प्राइस-डिस्कव्हरी सेशननंतर ४०० रुपयांवर उघडला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत यात सुमारे २% ची वाढ नोंदवण्यात आली आहे.
ज्या गुंतवणूकदारांकडे रेकॉर्ड डेट म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्सचे शेअर्स होते, त्यांना टाटा मोटर्सच्या प्रत्येक १ शेअरमागे डिमर्जरनंतर तयार झालेल्या TMLCV कंपनीचा १ शेअर मिळणार असल्याची माहिती आहे. व्यावसायिक वाहन युनिटचं (TMLCV) ट्रेडिंग BSE आणि NSE वर नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कंपनीच्या मते, व्यवसायाला वेगवेगळ्या दिशांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि वाढीसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. प्रवासी वाहन युनिट आता इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) आणि जॅग्वार लँड रोव्हर (JLR) यांसारख्या विभागांवर लक्ष केंद्रित करेल, तर व्यावसायिक युनिट ट्रक्स आणि बसेसचा व्यवसाय पुढे नेण्यात येतील.
हे देखील वाचा – IB Recruitment 2025: 258 पदांची मेगाभरती! लेखी परीक्षा नाही, थेट निवड; लगेच अर्ज करा
(टीप – हि माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही.)









