निकाहत – लवलीनाचा बॉक्सिंगमध्ये गोल्डन पंच

दिल्ली – मेरिकॉमच्या नंतर भारतीय महिला बॉक्सरनी पुन्हा एकदा बॉक्सिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. वुमन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये भारतीय महिलांनी 4 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. भारताच्या स्टार महिला बॉक्सर निकाह जरीन आणि लवलीना बोर्गोहेम यांनी विदेशी बॉक्सरना आस्मान दाखवून सुवर्णपद पटकावले आहे. दिल्लीत झालेल्या महिला विश्‍वचॅम्पियनशीप बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निकाह जरीन हिने 50 किलो वजनी गटात व्हिएतनामच्या गुयेन थीटॅम हिला 5-0 ने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. पहिल्या फेरीत निकाहतने निर्विवाद बाजी मारली होती, पण दुसर्‍या फेरीत मात्र तिला प्रतिस्पर्ध्याकडून कडवा प्रतिकार झाला. मात्र तरीही तिने सुवर्णपदक पटकावले. तर 75 किलो वजनी गटात भारताच्या लवलीना बॉर्गोहेम हिने ऑस्टे्रलियाच्या कॅटलीन पार्कर हिचा 5-2 अशा गुणांनी पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत प्रथम नितू घंघाशने 45-48 किलो वजनी गटात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर स्वीटी बुरा हिनेही 75-81 किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि त्यानंतर आज निकाहत जरीन हिने 50 किलो वजनी गटात तर लवलीना बोर्गोहेम हिने 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून दिले. या चारही महिला बॉक्सरने आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर लढताना अत्यंत आक्रमकपणे त्यांच्यावर हल्ले करून लागोपाठ गुण घेतले. निकाहतने तर प्रतिस्पर्धी बॉक्सरला संधीच मिळू दिली नाही. मात्र ऑस्टे्रलियन बॉक्सर कॅटलीना आणि भारताच्या लवलीना हिचा सामना काहीसा संघर्षपूर्ण झाला. पण तरीही लवलीनाने 5-2 ने विजय मिळवला.

Scroll to Top