Home / देश-विदेश / NEET UG Re-Exam: नीट री-एक्झामचे अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 21 जूनला होणार परीक्षा, डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

NEET UG Re-Exam: नीट री-एक्झामचे अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 21 जूनला होणार परीक्षा, डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

NEET UG Re-Exam: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट (NEET UG) परीक्षेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे....

By: Team Navakal
NEET UG Re-Exam: नीट री-एक्झामचे अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 21 जूनला होणार परीक्षा, डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Social + WhatsApp CTA

NEET UG Re-Exam: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट (NEET UG) परीक्षेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने म्हणजेच एनटीएने (NTA) नीट री-एक्झामचे अ‍ॅडमिट कार्ड 14 जून 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर केले आहे. ही परीक्षा आता 21 जून 2026 रोजी घेतली जाणार आहे.

परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार आता नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नवीन प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने तपासू आणि डाऊनलोड करू शकतात. अ‍ॅडमिट कार्ड हे परीक्षेसाठी अनिवार्य कागदपत्र असून, त्यावर विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्राचा पत्ता आणि परीक्षेची वेळ यांसारखी महत्त्वाची माहिती दिलेली असते.

कसे असेल परीक्षेचे स्वरूप आणि पॅटर्न?

यंदाची नीट री-एक्झाम 21 जून 2026 रोजी देशभरात एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे ऑफलाईन म्हणजेच पेन आणि पेपर मोडमध्ये होईल.

  • एकूण प्रश्न: परीक्षेत एकूण 180 प्रश्न विचारले जातील.
  • विषयानुसार विभागणी: यामध्ये भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) या विषयांचे प्रत्येकी 45 प्रश्न असतील, तर जीवशास्त्र (Biology) विषयाचे तब्बल 90 प्रश्न विचारले जातील.
  • वेळेची मर्यादा: परीक्षा सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण 3 तासांचा वेळ दिला जाईल. दिव्यांग (PwD) उमेदवारांना पेपर लिहिण्यासाठी अतिरिक्त 1 तासाचा सवलतीचा वेळ मिळेल.
  • भाषेचा पर्याय: विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदीशिवाय मराठी, गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि पंजाबीसह एकूण 13 प्रादेशिक भाषांमध्ये पेपर देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वेबसाईट चालत नसेल तर ‘डिजिलॉकर’चा पर्याय

अनेकदा एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटवर आल्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता असते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. जर मुख्य वेबसाईटवरून अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यात अडचण येत असेल, तर उमेदवार ‘डिजिलॉकर’ (DigiLocker) अ‍ॅप किंवा पोर्टलका वापर करूनही आपले हॉल तिकीट मिळवू शकतात.

प्रवेशपत्रावर कोणतीही चूक किंवा नावामध्ये गडबड आढळल्यास, उमेदवारांनी तातडीने सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत एनटीएच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थी आपल्या तक्रारी ईमेलद्वारे neetug2026@nta.ac.in या पत्त्यावर पाठवू शकतात. एकदा अ‍ॅडमिट कार्डवर दिलेले परीक्षा केंद्र, माध्यम आणि तारीख यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील ७ सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  • सर्वप्रथम नीटच्या अधिकृत वेबसाईटला (neet.nta.nic.in) भेट द्या.
  • होमपेजवर असलेल्या “NEET UG 2026 Admit Card” या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर नवीन लॉगइन पेज ओपन होईल.
  • येथे तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड अचूक भरा.
  • खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून ‘सबमिट’ या बतनावर क्लिक करा.
  • तुमचे अ‍ॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल, त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
  • भविष्यातील वापरासाठी या अ‍ॅडमिट कार्डची एक प्रिंट आऊट काढून स्वतःजवळ ठेवा.
Web Title:
संबंधित बातम्या