PM Modi Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री परिषदेची एक अत्यंत महत्त्वाची आणि विस्तृत बैठक पार पडली. सेवा तीर्थ येथे ही बैठक तब्बल साडेचार तास चालली. चालू वर्षातील ही पहिलीच पूर्ण मंत्री परिषदेची बैठक होती.
रिपोर्टनुसार, या बैठकीत प्रशासकीय सुधारणा, सरकारी कामांमधील गती आणि ‘विकसित भारत 2047’ या दीर्घकालीन उद्दिष्टांवर सखोल चर्चा करण्यात आली. सध्याच्या एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला २ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या बैठकीकडे सरकारचा ‘मिडटर्म रिव्ह्यू’ म्हणजेच मध्यावधी आढावा म्हणून पाहिले जात आहे.
PM Modi Meeting: ‘विकसित भारत’ हा केवळ नारा नाही!
बैठकीत मंत्र्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी एक मोठा संदेश दिला. 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट हे केवळ एक घोषणा किंवा नारा नसून, तो आपल्या सर्वांचा दृढ संकल्प असला पाहिजे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
- कामकाजात गती: सरकारी फायलींचा वेगाने निपटारा करणाऱ्या मंत्रालयांचे बैठकीत कौतुक करण्यात आले.
- दरी कमी करणे: सामान्यांचे जीवन सुसह्य करणे आणि उद्योग क्षेत्राला चालना देणे यावर भर देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
- मंत्रालयांचे सादरीकरण: निती आयोग आणि कॅबिनेट सचिवांसह ९ प्रमुख मंत्रालयांनी त्यांच्या कामगिरीचा आणि भविष्यातील नियोजनाचा सविस्तर अहवाल सादर केला.
PM Modi Meeting: पश्चिम आशियातील संकटावर चर्चा
या महत्त्वाच्या बैठकीत सध्या पश्चिम आशियामध्ये (मिडल ईस्ट) सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीवर आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, यावरही चर्चा झाली.
- नागरिकांना त्रास नको: या जागतिक संकटामुळे ऊर्जा, शेती, खते, विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा कोणताही फटका देशातील सामान्य नागरिकांना बसू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.
- परराष्ट्र मंत्र्यांची माहिती: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या नुकत्याच पार पडलेल्या ५ देशांच्या यशस्वी दौऱ्याची आणि त्यातून झालेल्या राजनैतिक फायद्यांची माहिती सर्व मंत्र्यांना दिली.
PM Modi Meeting: पाच देशांच्या दौऱ्यातून मोठे करार
पंतप्रधान मोदी नुकतेच संयुक्त अरब अमिराती (UAE), नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या ५ देशांचा दौरा करून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात भारताने अनेक महत्त्वाचे करार केले आहेत:
- यूएई (UAE): भारताने पेट्रोलियम साठे आणि संरक्षणाबाबत अनेक करार केले असून अबुधाबीने भारतात 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे.
- नेदरलँड: दोन्ही देशांमध्ये तब्बल 17 नवीन करार झाले असून संबंधांना धोरणात्मक भागीदारीत बदलण्यात आले आहे.
- इटली आणि नॉर्डिक देश: इटलीसोबत विशेष धोरणात्मक भागीदारी करण्यात आली, तर स्वीडन आणि नॉर्वेसोबत क्लीन एनर्जी आणि डिजिटल तंत्रज्ञानावर सहमती झाली.
या यशस्वी जागतिक दौऱ्याबद्दल आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या मोठ्या विजयाबद्दल बैठकीत पंतप्रधान मोदींचा विशेष सत्कारही करण्यात आला.
हे देखील वाचा – NEET UG 2026: ‘नीट’चा पेपर फुटलाच नव्हता! संसदेच्या समितीसमोर NTA चा धक्कादायक दावा








