Beijing Skyscraper Plane Crash: चीनची राजधानी बीजिंगमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. बीजिंगमधील सर्वात उंच आणि भव्य समजल्या जाणाऱ्या एका स्कायस्क्रॅपरला एका लहान विमानाने थेट धडक दिली. शुक्रवार दिलेली ही घटना असून या भीषण अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. ज्या इमारतीला हे विमान धडकले, ती तब्बल 108 मजली उंच इमारत असून तिचे नाव सीआयटीआयसी टॉवर आहे.
हे टॉवर चीन सरकारच्या मालकीच्या सीआयटीआयसी ग्रुपचे मुख्य मुख्यालय आहे. प्रत्यक्षदर्शींनी कॅमेऱ्यात कैद केलेल्या दृश्यांमध्ये विमानाची धडक बसल्यानंतर इमारतीच्या वरच्या भागातून मोठ्या प्रमाणावर ढिगारा आणि काचा खाली कोसळताना दिसत आहेत. या अपघातामुळे बीजिंग शहरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावरून धुराचे प्रचंड लोट हवेत पसरले आहेत.
Beijing Skyscraper Plane Crash: इमारतीचे मोठे नुकसान आणि जमिनीवर लागलेली आग
विमानाची धडक इतकी जोरदार होती की इमारतीचे दोन मोठे काचेचे पॅनेल पूर्णपणे फुटले असून इमारतीचा एक भाग क्षतीग्रस्त झाला आहे. अपघातानंतर विमानाचा शेपटीचा भाग (टेल सेक्शन) थेट खाली जमिनीवर येऊन पडला. तसेच इमारतीवरून पडलेल्या अवशेषांमुळे खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टॅक्सीची काचही फुटली आहे.
विमान कोसळल्यानंतर जमिनीवर एका भागात लहान आग देखील लागली. सुदैवाने या इमारतीची क्षमता जमिनीच्या वर 108 मजले आणि जमिनीच्या खाली 7 मजले अशी असून यामध्ये सुमारे 12000 कर्मचारी एकत्र काम करू शकतात. अपघाताच्या वेळी इमारतीमध्ये किती लोक उपस्थित होते आणि यात नेमकी किती जीवितहानी झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
今天下午,一架型号为 B-12PP 的国产轻型通航小飞机,撞到了北京第一高楼 – 中国尊 pic.twitter.com/CobNs6fSBA
— Sea (@Sea_Bitcoin) June 26, 2026
Beijing Skyscraper Plane Crash: घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त; फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याचे आदेश
इंटरनॅशनल मीडिया रिपोर्टनुसार, अपघाताची माहिती मिळताच चिनी पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसराला वेढा घातला. पोलिसांनी टॉवरच्या सभोवतालचे सर्व रस्ते बंद केले असून सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रत्यक्षदर्शींना या घटनेचे व्हिडिओ बनवण्यापासून रोखले आहे.
चिनी प्रशासनाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना त्यांनी मोबाईलमध्ये काढलेले फोटो आणि व्हिडिओ त्वरित डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. चीनमधील स्थानिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देखील या अपघाताचे सर्व व्हिडिओ आणि फोटो तातडीने हटवण्यात (सेन्सॉर) आले आहेत. मात्र, जागतिक स्तरावर ‘X’ (ट्विटर) सारख्या माध्यमांवर हे व्हिडिओ अद्यापही पाहायला मिळत आहेत.
Beijing Skyscraper Plane Crash: अपघातग्रस्त विमान नक्की कोणते होते?
घटनेच्या फोटोंचे बारकाईने विश्लेषण केले असता, हे विमान एका लहान कारच्या आकाराचे असल्याचे दिसून येत आहे. या विमानाचा नोंदणी क्रमांक चीनमध्येच तयार होणाऱ्या ‘Sunward SA 60L Aurora’ या हलक्या स्पोर्ट्स विमानाशी जुळणारा आहे.
बीजिंगमधील कडक नियम: बीजिंगमध्ये सुरक्षा कारणास्तव 1 मे पासूनच ड्रोन उडवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, सरकारी मंजुरीशिवाय कोणालाही ड्रोन खरेदी, भाड्याने देणे किंवा उडवण्याची परवानगी नाही. अशा कडक सुरक्षेत हे विमान थेट सर्वात उंच इमारतीला कसे धडकले, याबाबत चिनी अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित कंपनीने अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
विमान उत्पादक कंपनी: हे विमान एका स्थानिक जनरल एव्हिएशन कंपनीद्वारे चालवले जाते, जी वैमानिक प्रशिक्षण (पायलट ट्रेनिंग), वैयक्तिक मनोरंजन उड्डाणे आणि हवाई फोटोग्राफी यांसारख्या सेवा पुरवते.









