Home / देश-विदेश / Thalapathy Vijay Swearing In: थलपती विजय ‘या’ तारखेला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? सत्तास्थापनेसाठी ‘TVK’च्या हालचालींना वेग; काँग्रेस देणार पाठिंबा?

Thalapathy Vijay Swearing In: थलपती विजय ‘या’ तारखेला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? सत्तास्थापनेसाठी ‘TVK’च्या हालचालींना वेग; काँग्रेस देणार पाठिंबा?

Thalapathy Vijay Swearing In: तमिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ विजय यांनी इतिहास घडवला असून, आता ते सत्तास्थापनेच्या उंबरठ्यावर आहेत. विजय यांचा पक्ष...

By: Team Navakal
Thalapathy Vijay Swearing In
Social + WhatsApp CTA

Thalapathy Vijay Swearing In: तमिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ विजय यांनी इतिहास घडवला असून, आता ते सत्तास्थापनेच्या उंबरठ्यावर आहेत. विजय यांचा पक्ष ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) ७ मे, गुरुवार रोजी शपथविधी उरकून घेण्याच्या तयारीत आहे.

विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकल्यानंतर आता बहुमतासाठी आवश्यक असलेला १० आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

Thalapathy Vijay Swearing In: सत्तास्थापनेचे गणित आणि काँग्रेसचा पाठिंबा

२३४ सदस्य असलेल्या तमिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ आकड्याची गरज आहे. विजय यांच्या पक्षाकडे सध्या १०८ जागा आहेत. हा १० जागांचा फरक भरून काढण्यासाठी टीव्हीकेने काँग्रेस, व्हीसीके आणि डाव्या पक्षांशी संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडे अधिकृतपणे पाठिंबा मागितला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि व्हीसीके यांसारखे पक्ष विजय यांना साथ देण्याची दाट शक्यता आहे.

Thalapathy Vijay Swearing In: राज्यपालांकडे मागितला वेळ

टीव्हीकेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विजय यांनी राज्यपाल व्ही.आर. आर्लेकर यांना ईमेल पाठवला आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांनी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता असून, राज्यपाल कधी वेळ देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Thalapathy Vijay Swearing In: इतर पक्षांची भूमिका काय?

  • व्हीसीके (VCK): पक्षाचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी म्हटले आहे की, जनतेने कोणत्याही एका पक्षाला बहुमत न देऊन ‘आघाडी सरकार’ स्थापन करण्याचा कौल दिला आहे. डाव्या पक्षांशी चर्चा करून ते आपला निर्णय जाहीर करतील.
  • एआयएडीएमके (AIADMK): टीव्हीकेचे नेते के.ए. सेंगोट्टइयन आणि आधाव अर्जुना हे अण्णा द्रमुकच्या काही निर्वाचित आमदारांशी देखील संपर्कात असल्याची चर्चा आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, जर धर्मनिरपेक्ष पक्षांनी विजय यांना पाठिंबा दिला नाही, तर टीव्हीकेला भाजपच्या जवळ जाण्याची संधी मिळू शकते. त्यामुळेच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष विजय यांना साथ देऊन तमिळनाडूमध्ये नवीन सत्तासमीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

हे देखील वाचा – 

Mamata Banerjee Resignation: पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनाम्यास नकार! आता पुढे काय होणार? जाणून घ्या

West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Web Title:
संबंधित बातम्या