Home / देश-विदेश / West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

West Bengal CM Race: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद...

By: Team Navakal
West Bengal CM Race
Social + WhatsApp CTA

West Bengal CM Race: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमी असलेल्या बंगालमध्ये सत्ता स्थापन करणे हे भाजपसाठी नेहमीच मोठे उद्दिष्ट राहिले आहे. आता या विजयानंतर राज्याची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात खलबते सुरू झाली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ब्रँड’वर विश्वास दाखवत बंगालच्या जनतेने भाजपला कौल दिला आहे. प्रचारादरम्यान अमित शाह यांनी “बंगाली” व्यक्तीच मुख्यमंत्री होईल असे आश्वासन दिले होते, तर सुकांत मजुमदार यांनी मुख्यमंत्री “मांसाहारी” असेल असे सांगत स्थानिक संस्कृतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता.

West Bengal CM Race: मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार

  • सुवेंदु अधिकारी: एकेकाळी ममता बॅनर्जींचे खंदे समर्थक राहिलेले सुवेंदु अधिकारी हे सध्या या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये ममतांचा पराभव करणाऱ्या सुवेंदु यांच्याकडे दांडगा जनसंपर्क आणि मजबूत संघटनात्मक जाळे आहे.
  • अग्निमित्रा पॉल: फॅशन डिझायनर आणि भाजप महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा अग्निमित्रा पॉल यांचे नावही चर्चेत आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा भाजपने प्रचारात लावून धरला होता, त्यामुळे एका महिला नेत्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
  • रूपा गांगुली: ‘महाभारत’ मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या रूपा गांगुली या भाजपच्या लोकप्रिय नेत्या आहेत. त्यांना शहरी भागातून मोठा पाठिंबा मिळतो.
  • दिलीप घोष: भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आक्रमक नेते म्हणून दिलीप घोष ओळखले जातात. आरएसएसचे जुने कार्यकर्ते असलेल्या घोष यांनी पक्षाचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
  • शमिक भट्टाचार्य: भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते म्हणून शमिक भट्टाचार्य यांची ओळख आहे. पडद्यामागून काम करण्यात ते माहीर मानले जातात.

भाजप नेहमीच अनपेक्षित चेहऱ्याला संधी देण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे सुवेंदु अधिकारींसारख्या वजनदार नेत्याला मुख्यमंत्री केले जाते की एखाद्या महिला नेत्याला संधी देऊन भाजप ‘प्रो-वुमन’ प्रतिमा अधिक गडद करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे देखील वाचा – Election Result : ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला खिंडार, तर तामिळनाडूत विजयचा धमाका; कोणाला धक्का, कोण ठरला नायक? वाचा नेत्यांच्या जय-पराजयाची संपूर्ण कुंडली…

Web Title:
संबंधित बातम्या