US Iran Peace Accord: गेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त काळापासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला भीषण संघर्ष अखेर संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करत इराण आता कधीही अण्वस्त्र तयार न करण्यास तयार झाल्याचे सांगितले आहे.
वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात युद्ध संपवण्यासाठी एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून ट्रम्प यांनी या करारातील मुख्य तरतुदीला जाहीर पाठिंबा दिला आहे.
या ऐतिहासिक घडामोडीनंतर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विरोधकांवर कडाडून टीका केली. त्यांनी लिहिले की, इराण कधीही अण्वस्त्र तयार करणार नाही यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. तसेच अमेरिका इराणला ३०० दशलक्ष डॉलर्स देत असल्याची बातमी पूर्णपणे खोटी असून ती विरोधकांनी पसरवली आहे. प्रत्यक्षात माध्यमांमध्ये ३०० अब्ज डॉलर्सच्या पॅकेजची चर्चा सुरू आहे, ज्याचा ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे निषेध केला आहे.
उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याकडून कराराचे कौतुक; जिनिव्हात होणार अधिकृत सोहळा
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही या कराराला ट्रम्प प्रशासनाचे मोठे राजनैतिक यश म्हटले आहे. इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखणे हे सुरुवातीपासूनच आमच्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट होते, असे त्यांनी स्पष्ट केले. फ्रान्समध्ये होणाऱ्या जी७ (G7) परिषदेसाठी पोहोचलेल्या ट्रम्प यांनी सांगितले की, आगामी शुक्रवारी जिनिव्हा येथे होणाऱ्या अधिकृत स्वाक्षरी सोहळ्याला उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स उपस्थित राहणार आहेत.
दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या कराराला युद्ध थांबवण्याच्या दिशेने पडलेले एक ‘महत्त्वाचे पाऊल’ म्हटले आहे. मात्र, हा केवळ प्राथमिक करार असून कायमस्वरूपी शांततेसाठी अंतिम करारावर अजून चर्चा होणे बाकी असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जेडी व्हान्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्राथमिक करार केवळ दीड पानावराचा एक सामान्य दस्तऐवज आहे आणि याचे सविस्तर तपशील आगामी काही दिवसांत जाहीर केले जातील.
करारातील मुख्य अटी आणि भारतावर होणारा परिणाम
या नवीन कराराच्या मसुद्यानुसार दोन्ही देशांनी एकमेकांसमोर काही कडक अटी ठेवल्या आहेत:
- अण्वस्त्रांवर बंदी: इराणला अमेरिकेच्या मुख्य अटी मान्य कराव्या लागतील, ज्यामध्ये कधीही अण्वस्त्र न बनवणे आणि हिजबुल्लासारख्या प्रादेशिक बंडखोर संघटनांना देणारा पाठिंबा पूर्णपणे बंद करणे समाविष्ट आहे.
- अणुकेंद्र तपासणी: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) निरीक्षक पुन्हा एकदा इराणमध्ये जाऊन तपासणी करू शकतील आणि इराणजवळील युरेनियमचा साठा नष्ट करण्यासाठी दोन्ही देश मिळून काम करतील.
- आर्थिक निर्बंधांमधून सूट: करारानुसार अमेरिकेकडून इराणला आर्थिक निर्बंधांमधून मोठी सूट दिली जाईल. तसेच चर्चा सुरू असेपर्यंत अमेरिका इराणवर कोणतेही नवीन निर्बंध लादणार नाही आणि मध्य पूर्वेत आपले अतिरिक्त सैन्यही तैनात करणार नाही.
- सैन्य माघारीचा प्लॅन: जर अंतिम अणुकरार यशस्वी झाला, तर संघर्ष सुरू असताना तैनात केलेले अमेरिकन सैन्य ३0 दिवसांच्या आत मागे घेतले जाईल आणि एका निश्चित वेळापत्रकानुसार इराणवरील सर्व निर्बंध कायमचे उठवले जातीन.
हे देखील वाचा – Abhijit Dipke Attack: “10 वेळा कानाखाली मारली तरी…” जयपूरमधील हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया










