LPG Cylinders Explode – जयपूर-अजमेर महामार्गावर (Jaipur–Ajmer Highway)काल रात्री ११ वाजताच्या सुमारास सावरदा पुलाजवळ भीषण अपघात झाला. एलपीजी सिलिंडरने (LPG cylinders) भरलेल्या ट्रकला रासायनिक पदार्थ (chemical substances)वाहून नेणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकला आग लागली आणि एकामागोमाग सिलिंडर फुटू लागले. फक्त दोन तासांत तब्बल २०० सिलिंडरचे स्फोट झाले. या भीषण दुर्घटनेत एकाचा जळून मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्फोटांचा आवाज १० किलोमीटरपर्यंत ऐकू येत होता, तर आकाशात प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत होते. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आणि महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रत्यक्षदर्शींनुसार, आरटीओ (RTO)वाहन पाहून टँकर चालकाने स्वतःला वाचवण्यासाठी टँकर ढाब्याकडे वळवला. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या गॅस सिलिंडरच्या ट्रकला तो धडकला. धडकेनंतर टँकर आणि ट्रक दोघांनाही आग लागली आणि स्फोटांची मालिका सुरू झाली.
३३० सिलिंडरने भरलेल्या या ट्रकमधील सुमारे २०० सिलिंडरचा स्फोट झाला. एका जळत्या सिलिंडरने जवळच्या रेस्टॉरंटमध्ये घुसल्याने गोंधळ उडाला, तसेच ट्रकजवळ उभ्या असलेल्या पाच वाहनांनाही आग लागली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. महामार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद ठेवण्यात आली होती आणि पहाटे साडेचार वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी अजमेरहून जयपूरकडे जाणारी वाहने रूपनगढमार्गे, तर जयपूरहून अजमेरकडे जाणारी वाहने २०० फूट बायपासमार्गे टोंक रोडकडे (Tonk Road.) वळवली.
हे देखील वाचा –
दगडूशेठ गणपती ट्रस्टकडूनपूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी
इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांचा पुतळा पुढील वर्षी पूर्ण उभारणार पुतळ्याचे बूट आले