Home / दिनविशेष / Vijay Mallya : मल्ल्याच्या दान केलेल्या सोन्याची नोंदही गायब

Vijay Mallya : मल्ल्याच्या दान केलेल्या सोन्याची नोंदही गायब

Vijay Mallya -अनेक बँकांना कोट्यवधी रुपयांना फसवून केंद्र सरकारच्या हातावर तुरी देऊन परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या याने सबरीमाला मंदिराला...

By: Team Navakal
vijay mallya


Vijay Mallya -अनेक बँकांना कोट्यवधी रुपयांना फसवून केंद्र सरकारच्या हातावर तुरी देऊन परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या याने सबरीमाला मंदिराला (Sabarimala temple)दान दिलेल्या ३० किलो सोन्याची (Gold) नोंद गायब झाली आहे. या सोन्याची जाणीवपूर्वक चोरी झाली असावी किंवा त्यात काही काळेबेरे असावे असा संशय व्यक्त होत आहे. केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) मंदिराचे सर्व नोंद वह्या जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.


फरार आर्थिक फसवणूक केलेला आरोपी विजय मल्ल्या याने सबरीमाला मंदिराच्या छतासाठी ३० किलो सोने (30 kg of gold )दान देण्याची घोषणा केली होती. त्याच्या या दानाच्या नोंदी मंदिराच्या व्यवस्थापन कार्यालयातून गायब झाल्या आहेत. या दानाची कोणतीही नोंद मंदिराच्या हिशेब पुस्तकांमध्ये आढळत नाही. हे सोने कदाचित तांब्यामध्ये (copper) बदलण्यात आले असावे.

ही नोंद न आढळल्याने या मंदिराचे वार्षिक लेखापरिक्षणही अपूर्ण राहिले आहे. त्रावणकोर देवसम बोर्डाच्या (Travancore Devaswom Board) तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, हे सोने अपघाताने गायब झालेले नसावे तर यामध्ये काही कारस्थान असले पाहिजे. हे प्रकरण सध्या केरळ उच्च न्यायालयात असून न्यायालयाने मंदिराच्या सर्व नोंदी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.


हे देखील वाचा –

नवज्योतसिंग सिद्धूची पत्नी पुन्हा विधानसभा लढवणार

 पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका आता लांबणीवर!३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत

 रशियन तेल खरेदी केल्यास जी-७ देशही निर्बंध लादणार

Web Title:
संबंधित बातम्या