पॉलिसी बाजारचा शेअर घसरला, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी

पॉलिसीबाजारचे शेअर्स खरेदी करण्याची चांगली संधी साधून आली आहे. कारण पॉलिसीबाझार (PolicyBazaar) अर्थात पीबी फिनटेकचे शेअर्स आज शुक्रवारी १० टक्क्यांपर्यंत खाली घसरले.

त्यामुळे शेअर बाजारातील विश्लेषकांनी या घासरणीला संधी मानली आहे. अल्प ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी या संधीचा लाभ घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. कारण, येत्या काही काळात या शेअर मध्ये जोरदार नफा होणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत पॉलिसी बाजारचा स्टॉक 1000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तसेच, पीबी फिनटेक स्टॉकला 775 रुपयांवर चांगला सपोर्ट मिळू शकतो आणि डाउनसाइड ब्रेकआउटवर तो 720 ते 700 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे, पोझिशनल गुंतवणूकदारांनी काही काळ प्रतीक्षा करावी. स्टॉक क्लोजिंग बेसिसवर 850 रुपयांच्या वर गेल्यास लक्षणीय वाढ होऊ शकते.

Scroll to Top