म्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा पुनर्विश्वास

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे – २०२१-२२ मध्ये देशातील म्युच्युअल फंड उद्योगाने नववीन विक्रम प्रस्थापित केले. एकूणच एका कठीण वर्षाच्या कालावधीनंतर म्युच्युअल फंड उद्योगात गुंतवणूकदारांचा विश्वास परत आला आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाने गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे मार्च २०२२ पर्यंत ३७.५० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले. कोविड-१९ उद्रेक, लॅकडाऊन आणि त्याचबरोबर आणि फ्रँकलिन टेम्पलटन डेट फंड संकट, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देशावरील अर्थकारणावर होणारा विपरित परिणाम आदींमुळे गेल्या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचा विश्वास म्युच्युअल फंड उद्योगाने परत मिळवला.

शेअर बाजारातील स्मॉल कॅप गटातील शेअरशी संबंधित योजनांनी गेल्या आर्थिक वर्षात सरासरी ३७ टक्के रिटर्न गुंतवणूकदारांना देऊ केले. तर पसंतीच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIPs) द्वारे म्युच्युअल फंड उद्योगात येणारे मासिक योगदान १२,३२९ कोटी रुपयांच्या नवीन विक्रमावर पोहोचले आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्युच्युअल फंडातील एकूण एसआयपी खात्यांची संख्या ५.३० कोटी होती.

रशिया-युक्रेन संकटामुळे आणि आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे शेअर बाजारातील अस्थिरता असूनही गुंतवणूकदारांच्या प्रवाहाच्या दृष्टीने इक्विटी योजनांसाठी हे वर्ष एक मजबूत वर्ष ठरले.

गेल्या आर्थिक वर्षात फंड कंपन्यांकडून अनेक नवीन फंड ऑफर (NFOs) सादर केल्या गेल्या. या उद्योगाने सादर केलेल्या फंड योजना गुंतवणूकदारांना आतापर्यंत उपलब्ध नसलेल्या गुंतवणुकीला वाव देणा-या ठरल्या. या एनएफओच्या माध्यमातून वर्षभरात रु. १ लाख कोटींहून अधिक विक्रमी निधी जमा झाला.

लॅकडाऊनमध्ये वाढलेले शेअर बाजारातील व्यवहार, वाढलेल्या डिमॅटधारकांची संख्या आदी देशातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या एक प्रकारे पथ्यावरच पडले. अस्थिरतेही स्थिर उत्पन्न व अधिक रिटर्नसह कमी जोखमेचा पर्याय म्हणून या गुंतवणूक पर्यायाची लोकप्रियता अधिक वाढली.

Scroll to Top