ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी बोगस वेबसाईट कार्यन्वित; नोंदणी करताना काळजी घेण्याचे आवाहन

असंघटित कामगारांना निवृ़त्तीनंतर आर्थिक मदत मिळावी याकरता केंद्र सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी देशभरात कोट्यवधी लोकांनी नोंदणीही केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ई-श्रमची नोंदणी करण्याकरतो बोगस संकेतस्थळाचा वापर वाढल्याचेही समोर आले आहे. . बनावट ई-श्रम वेबसाईटद्वारे बनावट ई-श्रम कार्ड बनवून ते लोकांची फसवणूक करत आहेत. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत पीआयबीने (PRESS INFORMATION BUREAU) लोकांना अशा बनावट वेबसाईट्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत म्हटले आहे की, \’ई-श्रमच्या अधिकृत पोर्टलची कॉपी करणाऱ्या बनावट वेबसाईट्सपासून सावध रहा.\’

ई-श्रम नोंदणीमुळे असंघटित कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे, छोटे व्यापारी, घरकाम करणारे कामगार आदी लोकांनी ई-श्रमवर नोंदणी केली आहे. आतापर्यंत २३ कोटींपेक्षा जास्त कामगारांनी नोंदणी केल्याचे समोर आले आहे. मात्र, यामध्ये अनेक कामगारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. कारण अनेकांनी बनावट वेबसाईटवरून नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ई-श्रम नोंदणी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नोंदणी करताना कशी काळजी घ्याल?

 https://eshram.gov.in/  ई-श्रम नोंदणीची ही अधिकृत वेबसाईट आहे. यावरच जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. इतर कोणत्याही वेबसाईटवर नोंदणी करू नका.

याबरोबरच ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करताना सरकार कोणतेही पैसे आकारत नाही. तुम्ही ऑफलाईन कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊनही नोंदणी करू शकता. 

Scroll to Top