पेटीएमच्या शेअर घसरणीची मुंबई शेअर बाजाराकडून दखल

गुंतवणूकदारांची निराशा करणाऱ्या पेटीएमच्या \’वन ९७ कम्युनिकेशन\’च्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. आयपीओवेळी वन ९७ कम्युनिकेशनची किंमत प्रति शेअर २१५० रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र पदार्पणाच्या दिवशी हा शेअर तब्बल १९ टक्क्यांनी गडगडला होता. या घसरणीतून तो अजूनही सावलेला नाही. गेल्या चार महिन्यांत या शेअरचे मूल्य ७४.७२ टक्क्यांनी कमी झाले आहे. आता या घसरणीची गंभीर दखल मुंबई शेअर बाजाराने घेतली आहे.

बीएसईने कंपनीला २२ मार्च २०२२ रोजी पत्र पाठवले असून घसरणीची कारणे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रावर पेटीएमकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. कंपनीने म्हटलंय, कंपनीची पाळेमुळे भक्कम आहेत. कंपनी भविष्यात वृद्धीची अपेक्षा व्यक्त करते. तसेच कंपनी शेअरबाबत वेळोवेळी शेअर बाजाराला माहिती देईल, अशी ग्वाहीही पेटीएमने दिली आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्सने शेअर बाजारात आयपीओ आणला होता. कंपनीने समभाग विक्रीतून १८,३०० कोटींचे भांडवल उभारले होते. आयपीओसाठी प्रति शेअर २,१३० रुपये भाव ठेवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात शेअर नोंदणीवेळी तो १९ टक्क्यांनी गडगडला. त्यानंतर मागील चार महिन्यात त्यात प्रचंड घसरण झाली आहे.

Scroll to Top