बँकिंग कामे उरकून घ्या! एप्रिलमध्ये नऊ दिवस बँका राहणार बंद

पुढच्या महिन्यात बँका तब्बल नऊ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे आताच बँकांच्या कामांचे नियोजन करून ठेवा. १ एप्रिल रोजी आर्थिक वर्षाचा हिशेब असल्याने बँका सर्वसामान्यांसाठी बंद असतील. त्यानंतर २ एप्रिल रोजी गुढी पाडवा आणि उगाडी असल्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांत सार्वजनिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील. तर, ३ एप्रिल रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. म्हणजेच एप्रिल महिन्यात सुरुवातीचे तीन दिवस बँका बंद राहतील.

एप्रिलचा पहिलाच आठवडा सुट्टीत गेल्यानंतर एप्रिल ९ रोजी दुसरा शनिवार आणि १० एप्रिल रोजी रविवार असल्याने बँका सलग दोन दिवस बंद राहतील. त्यानंतर १४ एप्रिल रोजी गुरुवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, वसंत पंचमी, बैसाखी, तामिळ नवीन वर्ष यानिमित्त राष्ट्रीय सुट्टी असेल. १५ एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त बँकांना सुट्टी असेल. २३ एप्रिल रोजी चौथा शनिवार आणि २४ रविवार असल्याने बँका बंद राहतील.

रिझर्व्ह बँकेच्या निगोशिएबल इन्स्ट्र्युमेंट अॅक्टनुसार काही सुट्ट्या या राष्ट्रीय पातळीवर सर्व सार्वजनिक बँका, खासगी बँका, पत संस्थांना लागू होतात. काही सुट्ट्या या स्थानिक पातळीवरील सण उत्सवानुसार लागू होतात.

Scroll to Top