Home / अर्थ मित्र / \’हे\’ काम लगेच करा, अन्यथा १० हजाराचा दंड भरा

\’हे\’ काम लगेच करा, अन्यथा १० हजाराचा दंड भरा

आयकर विभागाच्या नियमांनुसार, पॅन क्रमांक आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. ही दोन कागदपत्रे लिंक करणे अनिवार्य आहे, जर तुम्ही 31 मार्चपर्यंत तसे केले नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल.

पॅन-आधार कसं लिंक करायचं?

सर्वप्रथम तुम्ही आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal या साइटला भेट द्या.

यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला \’Link Aadhaar\’ टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला पॅनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक, नाव आणि मोबाइल क्रमांकाचा तपशील विचारला जाईल.

हे तपशील भरल्यानंतर, तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला OTP मिळेल. ओटीपी भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, तुमचे पॅन कार्ड आणि आधार लिंकिंगची पुष्टी होईल.

तुमचे पॅन कार्ड आणि आधार आधीच लिंक केलेले असल्यास, तुम्हाला त्याचे पुष्टीकरण दाखवले जाईल.