१० लाखांच्या डिपॉझिटवर ३.७० लाख रुपये; \’या\’ योजनेबाबत जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी 10 लाख रुपयांची एकरक्कमी गुंतवणूक केल्यास 5 वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर वार्षिक 7.4 टक्के (चक्रवाढ) व्याजदराने एकूण रक्कम 13 लाख 70 हजार रुपये होते. येथे आपल्याला 3,70,000 रुपये व्याजाचा लाभ मिळत आहे. अशाप्रकारे, प्रत्येक तिमाहीचे व्याज 18,500 रुपये असेल. या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याची एकरक्कमी गुंतवणूक करावी लागते.

SCSS खाते पोस्ट ऑफिसच्या शाखेत किमान 1000 रुपये ठेवीसह उघडता येते. या योजने अंतर्गत, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती खाते उघडू शकते. जर एखाद्याचे वय 55 वर्षे किंवा त्याहून अधिक परंतु 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने VRS घेतले असेल तर तो SCSSमध्ये खातेदेखील उघडू शकतो. मात्र यासाठी अट अशी आहे की, सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत त्याने हे खाते उघडले पाहिजे आणि त्यात जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीच्या लाभाच्या रक्कमेपेक्षा जास्त नसावी.

महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत, ठेवीदार त्याच्या/तिच्या जोडीदारासोबत वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे एकापेक्षा जास्त खाती ठेवू शकतो. परंतु सर्व खात्यांची कमाल गुंतवणूक मर्यादा 15 लाखांपेक्षा जास्त नसावी.

Scroll to Top