१ रुपयाच्या स्टॉकची किंमत पोचली १३९ रुपये, कोणत्या कंपनीने केली कमाल?

गेल्या काही दिवसांपासून अनेक पेनी स्टॉक फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार पेनी स्टॉकच्या शोधात असतात. त्यात सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. पाच दिवसांपूर्वी या कंपनीची शेअर किंमत १२१ होती, आज तो १३९.२५ रुपये झाला आहे.

महत्वाचे म्हणजे सहा महिन्यापूर्वी या शेअरची किंमत अवघे ९.७० रुपये होती. त्यानंतर हा स्टॉक चांगलाच वर आला. सप्टेंबरमध्ये शेअरमध्ये चांगली वाढ झाली. म्हणजेच या शेअर अल्पावधीत १३५० टक्के परतावा दिला आहे.

वर्षभरापूर्वी या स्टॉकची किंमत ७ रुपये होती. एवढेच नव्हे तर १७ फेब्रुवारी २०१७ रोजी हा स्टॉक १.६९ रुपयांनी ट्रेड करत होता. पाच वर्षात या स्टॉकमध्ये सुमारे 8100 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या एका महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 87.81 वरून 139.25 पर्यंत वाढला आहे. 

Scroll to Top