अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात केली वाढ

अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ मार्च २०२२ व्याजदरात वाढ केली आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरात अनेक बँकेने बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक या बँकांनी आपल्या मुदत ठेव व्याजदरात बदल केला होता. त्यानंतर आता अॅक्सिक बँकेने बदल केला आहे.

अॅक्सिक बँकेत ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कालावधीत मुदत ठेवीत गुंतवणूक करता येते. नव्या बदलानुसार १८ महिन्यांपासून ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या 2 कोटींपेक्षा कमी जमा मुदत ठेवींसाठी 5.25 टक्के व्याज देण्यात येत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवीवर 2.5 ते 6.50 टक्के व्याज मिळेल. 2 वर्षांच्या पण 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 5.40 टक्के व्याज देणार आहे. 3 वर्षांपेक्षा जास्त ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर बँकेचा व्याजदर 5.40 टक्के असेल.

तसेच, ५ ते १० वर्षांत म्यॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर ५.७५ टक्के व्याज देण्यात येत असून ७ दिवस ते १४ दिवसांपर्यंतच्या एफडीवर २.५० टक्के, १५ दिवस ते २९ दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींवर २.५० टक्के व्याज मिळणार आहे. तर, ३० ते ४५ दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ३ टक्के फडीवर 3 टक्के, 6 ते 3 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर 3.50 टक्के, 3 ते 4 महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 30 दिवस ते ४ महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 4 ते 5 महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 5 ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 6 ते 7 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के, 7 ते 8 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के, 8 ते 9 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के, 9 ते 10 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के व्याज मिळेल.

10 ते 11 महिने 4.40 टक्के
11 महिने आणि 11 महिने 25 दिवस 4.40 टक्के
1 वर्ष आणि 1 वर्ष 5 दिवस 5.10 टक्के
1 वर्ष 5 दिवस आणि 1 वर्ष 11 दिवस 5.15 टक्के
1 वर्ष 25 दिवस आणि 13 महिने 5.15 टक्के

Scroll to Top