विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले १७ हजार कोटी रुपये

नवी दिल्ली – विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मार्चच्या तिसऱ्या ट्रेंडिंग सत्रात भारतीय बाजारातून १७ हजार ५३७ कोटी रुपये काढले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम झाला आहे.

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी २ ते ४ मार्च दरम्यान इक्विटीमधून १४ हजार ७२१ कोटी रुपये तर कर्ज विभागाकडून २ हजार ८९८ कोटी रुपये काढले आहेत. तर, हायब्रीड इंस्ट्रुमेंटमधून ९ कोटी रुपये काढले आहेत. त्यामुळे एकूण १७ हजार ५३७ कोटी रुपये नेट आऊटफ्लो झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2021 पासून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत माघार घेत आहेत. मार्च 2020 पासून फेब्रुवारी 2022 मध्‍ये FPI चा जावक सर्वाधिक आहे.

Scroll to Top