शेअर बाजाराची साद आणि कंपन्यांचा प्रतिसाद

मावळत्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आणि वर्ष 2022 चा तिसरा मास. त्यातले पहिले 15 दिवस झाले आहेत. अनेक अर्थ घडामोडींचे हे दिवस राहिले. वित्त वर्ष समाप्तीला आता पंधरवडाही शिल्लक नाही. येणार्‍या आठवडा-दिड आठवड्यात या क्षेत्रात आणखी काय घडामोडी होतील, हे येणारे नजीकचे दिवसच सांगतील. शेअर बाजाराच्या दृष्टिने मार्चचे पहिले काही दिवस प्रचंड उलथापालथीचे राहिले. सेन्सेक्स, निफ्टीसारख्या महत्त्वांच्या इंडेक्सने मोठी तेजी-मंदीची हालचाल अनुभवली. त्याचबरोबर काही सेक्टोरिअल इंडेक्सही प्रभावित झाले. काही शेअरने त्यांचा गेल्या वर्षभराचा उच्चांक गाठला. तर काहींनी लोअर सर्कीट पाहिले. काही अजूनही महाग आहेत. तर काहींचा भाव पार रसातळाला गेलाय. या महिन्याच्या पहिल्या टप्प्यात लक्षणीय मूल्य हालचाल नोंदविणार्‍या अशाच काही महत्त्वाच्या शेअरच्या किंमतीवर नजर फिरवायला हवी.

छोटे मियाँ…

डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स – या कंपनीला बँक ऑफ बडोदाकडून नुकतेच एक मोठे काम मिळाले आहे. रु. 101 कोटी किंमतीच्या या कामासाठी कंपनी बँकेच्या 6 हजार शाखांमध्ये आपली सुविधा देणार आहे. कंपनीच्या याबाबतच्या तंत्रज्ञानामुळे बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या अ‍ॅप्लिकेशन्सशी जोडणारे व्हर्च्युअल आर्किटेक्चर उपलब्ध होऊन माहिती तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा नियंत्रण आणि व्यवस्थापन सुलभ होईल. शाखा कार्यालय संपर्क, विस्तारित जलद जाळे, ऑप्टिमाइझ अ‍ॅप्लिकेशन कार्यप्रदर्शन असे सारे त्यामुळे होईल.

जिंदाल स्टेनलेस – जिंदाल समुहातील दोन कंपन्यांमधील विलिनीकरणाच्या योजनेला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने नुकतीच मंजुरी दिली. जिंदाल स्टेनलेस लिमिटेड आणि जिंदाल स्टेनलेस (हिसार) लिमिटेड या दोन्ही शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्या एकत्र होतील. त्यांचा चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाही आणि गेल्या नऊ महिन्याचा एकत्रित महसूल अनुक्रमे रु. 8,880 कोटी आणि रु. 22,896 कोटी आहे. या विलिनीकरणानंतर एक मोठा स्टेनलेस स्टील समूह अस्तित्वात येईल. यामुळे जिंदाल स्टेनलेसला आघाडीच्या 10 जागतिक स्टेनलेस स्टील उत्पादकांमध्ये स्थान मिळेल.

गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड – या रासायनिक कंपनीने गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना 330% परतावा दिला. 2 मार्च 2021 पासून गुंतवणूकदारांची संपत्ती दुप्पट झाली. गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड ही नोएडास्थित एक रासायनिक उत्पादन कंपनी आहे. कंपनीच्या फ्लूरोपॉलिमर्सचा वापर इलेक्ट्रिक वाहने आणि सौर पॅनेलसारख्या नव्या उत्पादनांमध्ये होत आहे. कंपनीचे बिझनेस मॉडेल हाय-एंड व्हॅल्यू-एडेड फ्लोरोपॉलिमर्स आणि उच्च लाभ घेणार्‍या विशेष रसायनांकडे वळवळत आहे. कंपनीकडे फ्लोरोपॉलिमर बाजारपेठेतील आव्हानरहित नेतृत्व आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह जागतिक स्तरावर ती स्पर्धा करते.

शॅलेट हॉटेल्सचा – वार्षिक आधारावर कंपनी स्टॉकने 30% परतावा दिला आहे. शेअरने मोठ्या फरकाने व्यापक बाजारपेठ आणि त्याच्या स्पर्धकांना याबाबत मागे टाकले आहे. कंपनी स्टॉकमध्ये जोरदार तेजी दिसून येत असून त्यात उताराची चिन्हे तूर्त दिसत नाहीत. कंपनीचा स्टॉक सध्या एका दिवसाच्या उच्चांकावर व्यवहार करत आहे. इतर निर्देशही स्टॉकच्या तेजीकडे निर्देश करतात.

बडे मियाँ…

इन्फोसिस – इन्फोसिसने रोलँड-गॅरोसबरोबरच्या भागीदारीचे आणखी पाच वर्षांसाठी नूतनीकरण करण्याची घोषणा केली. या करारामुळे इन्फोसिस कंपनी अधिकृत तंत्रस्नेही नाविव्य भागीदारीसाठी तंत्रज्ञानाच्या मर्यादा अधिक विस्तारेल. सांख्यिकीय अनुभव वाढवण्यासह अनुभव वृद्धींगत करण्यावरही या अंतर्गत भर देण्यात येणार आहे. भविष्यातील अनुभवांमध्ये नवीन मिश्र वास्तव अनुभव आणि इमर्सिव्ह डिजिटल प्लॅटफॉर्मचा समावेश असेल.

टाटा एलक्सी – टाटा समुहातील ही डिझाईन आणि टेक्नॉलॉजी सेवा क्षेत्रामध्ये जागतिक अव्वल कंपनी आहे. कंपनीने रेनेसाँ इलेक्ट्रॅनिक्स कॉर्पोरेशन या सेमीकंडक्टर सोल्युशन पुरवठादार कंपनीबरोबर एका डिझाईन सेंटरबाबतच्या सहकार्याची घोषणा केली. अंतर्गत इलेक्ट्रिकसाठी लक्ष्यित सुविधा यामुळे विकसित होईल. ईलेक्ट्रिक वाहनांमध्ये त्याचा वापर होत आहे.

टीव्हीएस मोटर – टीव्हीएस मोटर कंपनी ही देशातील प्रतिष्ठित दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या निर्मात्यांपैकी एक आहे. कंपनीने बांगलादेशातील ग्राहकांसाठी 125 सीसी श्रेणीत वैशिष्ट्यपूर्ण सुविधा, तंत्रज्ञान देऊ देणारे टीव्हीएस रेडर सादर करण्याची घोषणा केली आहे. टीव्हीएस रेडर हे मोटरसायकल फर्स्ट-इन-क्लास अ‍ॅनिलिस्टिक एलईडी हेडलॅम्प, एलसीडी डिजिटल स्पीडोमीटर, 3व्ही आयटच स्टार्ट आणि आसनाखालील साठवणूक यांसारख्या वैशिष्ट्यांसह देते.
खेतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड – ही कंपनी सुपर फॉस्फेट, सल्फ्यूरिक ऍसिड आणि सोया तेल उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या शेअरने एका वर्षात 285% रिटर्न दिले आहेत. 8 मार्च 2021 पासून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे. सुपर फॉस्फेट, सल्फ्यूरिक अ‍ॅसिड निर्मिती, विक्री तसेच कच्च्या खाद्यतेलावर प्रक्रिया, पवन ऊर्जा निर्मिती आणि वितरण आदी कंपनीच्या व्यवसायाचा भाग आहे.

Scroll to Top