गुगल पे ची मर्यादा किती? दिवसाला तुम्ही किती व्यवहार करू शकता?

देशात नोटाबंदी झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. नेटबँकिंगसह युपीआय व्यवहार अधिकप्रमाणात केले जातात. पेटीएम, फोन पे, गुगल पे सर्वाधिक वापरले जाणारे मोबाईल वॉलेट आहेत. हे ऍप वापरताना काही बंधनेही असतात. प्रत्येक ऍपची व्यवहार करण्याची क्षमता आहे. या क्षमतेपलिकडे तुम्ही व्यवहार करू शकत नाही. गुगल पे चा वापर करतानाही तुम्हाला हा नियम वापरावा लागतो.

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेले गुगल पे वापरताना सिंगल डे ट्रान्झेक्शन लक्षात ठेवावं लागेल. कारण तुम्ही एका दिवसांत फक्त १ लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकता. तसेच, दिवसाला जास्तीत जास्त १० व्यवहार करू शकतात.

व्यवहारासाठी गुगल पेचे ज्याप्रमाणे लिमिट्स आहेत त्याचप्रमाणे बँकेचेही लिमिट्स आहेत. बँकेप्रमाणे हे लिमिट बदलत जाते. संबंधिक बँकांच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला बँकेच्या लिमिट्सविषयी माहिती मिळू शकेल.

… तर ऑनलाईन बँकिंग स्विकारा

तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी गुगल पेचा वापर करत असाल तर तुम्हाला नेट बँकिंग किंवा NEFT चाही वापर करावा लागू शकतो. कारण गुगलची मर्यादा संपली की तुम्हाला व्यवहारासाठी दुसरा पर्याय उरत नाही. अशा वेळी तुम्ही नेट बँकिंग किंवा NEFT करू शकता.

Scroll to Top