आता पेट्रोल-डिझेल खरेदीवर कॅशबॅक मिळवा, कोटक महिंद्रा बँकेचा IOC सोबत करार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरू असलेल्या उलथापालथीमुळे इंधन दरात वाढ होत आहे. भारतातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेल ११० रुपये पार झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांना इंधर खर्चात जरा बचत करता यावी याकरता कोटक महिंद्रा बँक आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी एक करार केला आहे. या काराराद्वारे त्यांनी इंडियन ऑइल कोटक को-ब्रँडेड फ्युएल क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना इंधन खरेदीवर कॅशबॅक मिळेल.

पेट्रोल-डिझेल खरेदी करताना ग्राहकांना कॅशबॅक मिळावा याकरता Fuel Credit Card ची रचना करण्यात आली आहे. ग्राहकांना इंधनाचा खर्च आणि नॉन फ्युएल आणि फ्रिक्वेंट खर्च करणार्‍या कॅटगरीवर, जसे की डायनिंग आणि ग्रोसरीवर चांगले रिवॉर्ड मिळतील.

पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी अनेकजण युपीआय किंवा इतर क्रेडिट कार्डचा वापर करतात. मात्र, प्रत्येकवेळी या मार्गातून कॅशबॅक मिळेलच असं नाही. त्यामुळे ग्राहकांना कॅशबॅक मिळावा आणि गरजेच्या वेळी उपयोगी पडावे याकरता फ्युअल क्रेडिट कार्डची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक संदीप मक्कर म्हणाले की, आम्ही कोटक महिंद्रा बँकेसोबतच्या टायअपबद्दल खूप उत्सुक आहोत. इंडियन ऑइल त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य प्रदान करून इंधन भरण्याचा अनुभव बदलण्यावर ठाम विश्वास आहे. मक्कर म्हणाले की, ही भागीदारी इंडियन ऑइल आणि कोटक महिंद्रा बँकेला त्यांच्या ब्रँडची पोहोच आणखी मजबूत करण्यास आणि ग्राहकांशी जोडण्यास मदत करेल.

Scroll to Top