Kwality pharmaceuticals ltd: २ वर्षांत १५०० पट परतावा देणारी कंपनी

क्वालिटी फार्मास्युटिकल्स या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल १५०० टक्के परतावा दिला आहे. २५.५५ रुपयांच्या या शेअरने दोन वर्षांतक ४०४.५५ रुपयांवर मजल मारली आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत.

या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये गेल्या सहा महिन्यात घसरण झाली. सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत ४५४.२५ होती ती घसरून ४०४.५५ वर आली. म्हणजेच सहा महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ११ टक्क्यांची घसरण झाली. मात्र, वर्षभराचा विचार केल्यास या कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. क्वालिटी फार्माचे शेअर्स गेल्या एका वर्षात 52.10 रुपयांवरून 404.55 रुपयांपर्यंत वाढले आहेत, या कालावधीत सुमारे 675 टक्के वाढ झाली आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर 1 लाखाचे 7.75 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये दोन वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवले असतील तर त्याचे आज 16 लाख झाले असते.

Scroll to Top