National Peroxide Ltd: हायड्रोजन पॅरॉक्साईडची सर्वात मोठी उत्पादक कंपनी

नॅशनल पॅरॉक्साईड लिमिडेट (NPL) ही भारतातील पॅरॉक्सिजन रसायनांसाठी अग्रणी कंपनी आहे. तसेच, भारतातील हायड्रोजन पॅरॉक्साईडची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे, ज्याची स्थापित क्षमता 150,000 MTPA 50% w/w आधारावर आहे. या कंपनीची स्थापना १६ मार्च १९५४ साली झाली असून या कंपनीचे मुख्यालय मुंबईतीली अंधेरी येथे आहे.

हायड्रोजन पॅरॉक्साईड हे विरंजन, रासायनिक संश्लेषण, पर्यावरण नियंत्रण/सांडपाणी उपचार, निर्जंतुकीकरण इत्यादीसाठी विविध उद्योगांमध्ये वापरले जाणारे एक अत्यंत उपयोगी रसायन आहे. हायड्रोजन पॅरॉक्साईडमधील \”सक्रिय ऑक्सिजन\” (Active Oxygen) हा घटक निर्जंतुकीकरणासह अनेकठिकाणी उपयोगाला येतो. अॅक्टिव्ह ऑक्सिजन हा हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या नियंत्रित विघटनाने प्राप्त होतो. म्हणूनच, ब्लीचिंग असो किंवा रासायनिक संश्लेषण असो, हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर सुरक्षित समजला जातो.

कल्याण येथील अद्ययावत प्लांटमध्ये ऑटो-ऑक्सिडेशन प्रक्रियेचा वापर करून हायड्रोजन पॅरॉक्साईडचे उत्पादन घेतले जाते. NPL चे हायड्रोजन पॅरॉक्साईड हे एकाग्र जलीय द्रावण आहे ज्यामध्ये वजनानुसार 50% हायड्रोजन पेरोक्साइड असते आणि सामान्यतः हायड्रोजन पेरोक्साइड 50% w/w म्हणून ओळखले जाते. हे विशेषतः भारतीय हवामानासाठी स्थिर आहे. तसेच, या कंपनीकडून कॉम्प्रेस्ड हायड्रोजन गॅस (Compressed Hydrogen Gas) आणि पर एसिटिक ऍसिड (Per Acetic Acid) देखील तयार करते.

गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. १८ एप्रिल १९९६ रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत १९३ रुपये होती. २६ वर्षांनी या कंपनीच्या शेअरची किंमत १५८५ रुपये झाली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांनी संयम राखला त्या गुंतवणूकदारांना या कंपनीने २६ वर्षांत १३९१ टक्के परतावा दिला आहे.

Scroll to Top