आता व्हॉट्सअॅपद्वारे करा आयपीओमध्ये गुंतवणूक

आयपीओमध्ये गुंतवणूक करणे आता आणखी सोपे होणार आहे. कारण इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस कंपनी असलेल्या जिओजित फायनान्सिअल सर्व्हिसेस लिमिडेट कंपनीने व्हॉट्सअॅपद्वारे सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत गुंतवणूकदार WhatsApp द्वारे IPO मध्ये गुंतवणूक करू शकतील.

Geojit आपल्या ग्राहकांना WhatsApp वर एंड-टू-एंड सपोर्ट देत असून यामुळे आयपीओसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या फिचरला e-IPO असे नाव देण्यात आले असून गुंतवणूकदारांना IPO अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसमध्ये सहजतेने नेव्हिगेट करण्यास अनुमती देते. तसेच, , Geojit Technologies ने डेव्हलप केलेले हे WhatsApp channel स्टॉक ट्रेडिंग आणि म्युचूअल फंड इंवेस्टमेंटची सुविधा देते.

जिओजितचे ग्राहक कोणताही App न उघडता WhatsApp chat window द्वारे कोणत्याही IPO चे सब्स्क्रिप्शन घेऊ शकतात. UPI आयडी असलेले आणि कोणतेही स्टॅण्डर्ड UPI-बेस्ड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन वापरणारे सर्व ग्राहक ही सर्व्हिस वापरू शकतील. मार्चमध्ये LIC सह 5 हून जास्त कंपन्या IPO आणणार आहेत. देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी LIC या महिन्यात IPO आणणार आहे. याशिवाय FarmEasy, Delhivery सह अनेक कंपन्या आपला IPO आणणार आहेत.

Scroll to Top