VST Tillers Tractors Ltd : शेती उत्पादनासाठी उपकरणे बनवणारी कंपनी

शेतीसाठी उपकरणे बनवणारी व्हीएसटी टीलर्स ही कंपनी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने बनवलेले ट्रॅक्टर भारतात शेतीसाठी वापरले जातात. १९६७ साली व्हीएसटी ग्रुप ऑफ कंपनीने या कंपनीची स्थापना केली. या ग्रुपचे संचालक व्हि.एस.थिरुवेंगडास्वामी यांनी १९११ साली व्हिएसटी अॅण्ड सन्सची स्थापना केली होती. याअंतर्गत त्यांनी पेट्रोलिअम उत्पादनं आणि ऑचोमोबाईलची विक्री केली. कर्नाटक आणि तमिळनाडूपर्यंत त्यांचा व्यवसाय मर्यादित होता.

या कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी जपानमधील Mitsubishiया कंपनीसोबतही करार केला होता. त्याअंतर्गत अनेक ट्रॅक्टरही तयार केले आहे. मात्र, VST Mitsubishi आता VST Shakti अंतर्गत ट्रक्टरचे उत्पादन आणि वितरण करते.

या कंपनीची वृद्धी पाहता या कंपनीने गेल्या काही वर्षांत चांगली प्रगती साधली आहे. तसेच, कंपनीच्या गुंतवणूकदारांनाही चांगला परतावा दिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स खाली उतरत आहेत.

डिसेंबर २०२१ मध्ये व्हिएसटी टिलर आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत २९ टक्के वाढ झाली होती. मात्र, डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर झालेल्या तिमाहित कंपनीचा मूळ नफा ३१.७२ टक्क्यांनी घटला आहे. या तिमाहित फक्त २१.०५ कोटींचा मूळ नफा झाला जो गेल्या डिसेंबरमध्ये ३०. ८३ कोटी होता. मात्र, असे असले तरी सेल्समध्ये २.७५ टक्क्यांनी वृद्धी झाली. डिसेंबर २०२० मध्ये २०२.८७ कोटींचा सेल्स झाला होता. डिसेंबर २०२१ मध्ये २०८.४४ कोटींचा नफा झाला.

मात्र गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. या कंपनीने याआधी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. मात्र, सध्या बाजारातील अस्थिरतेमुळे या कंपनीचे शेअर्सही घसरत आहे. येत्या काही दिवसांत हे चित्र पालटू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Scroll to Top